गुरुजी…जरा या ना शाळेत….
या.गुरुजी आपली उघडा शाळा
लावा आम्हा पुर्वी प्रमाणे लळा..,
तुमच्या प्रेमाची नाही बघा सर.
आता घरी राहिले ना कुणाचे डर
जरा या ना शाळेत..
घरचा अभ्यास.कळेना थोडे
गणित,ईंग्रजीत आडले घोडे
वर्गातच मिळे आम्हा चांगले धडे
मिञांच्या संगतीत पुढे चाले पाढे
जरा या ना शाळेत..
मैदानात खेळण्याची रित भारी
होई अभ्यास करण्याची तयारी
शाळेत येण्याची लागली ओढ
मिञ मैञिनिंची झाली फोड
जरा या ना शाळेत….
पाहून तुम्हाला लय दिस झाले
दिसता तुम्ही आनंदाने डोले.
रोज रोज घरी आला कंटाळा
गुरुजी आता उघडा बरं शाळा..
युसूफ शेख.आंबुलगेकर ..