खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाने मराठवाड्याचे मोठे नुकसान; सौ. आशाताई शिंदे

लोहा ; शैलेश ढेंबरे


युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार राजीव सातव यांचे दुःखद निधन झाल्यामुळे लोहा- कंधार मतदारसंघाचे आ. शामसुंदर शिंदे यांच्या लोहा येथील जनसंपर्क कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शोकसभा घेण्यात आली, यावेळी सौ. आशाताई शिंदे यांनी कै. खा. राजीव सातव यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली,

यावेळी शोकसभेत बोलताना सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे म्हणाल्या की, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे तीव्र दुःख व्यक्त करत नियतीने मराठवाड्यातील कै. विलासराव देशमुख, कै. गोपीनाथराव मुंडे ,कै. प्रमोद महाजन व दिवंगत खासदार राजीव सातव अश्या उमद्या नेत्याना नियतीने हिरावून घेतले असून कै.खासदार राजीव सातव यांच्या अकाली जाण्याने मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले झाले असून ,खासदार राजीव सातव यांच्या सारखा लढवय्या नेता मराठवाड्यात पुन्हा होणार नसल्याचे व ईश्वर कै.खा.राजीव सातव यांच्या कुटुंबाला या दुःखद प्रसंगी दुःख पेलण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना यावेळी सौ. आशाताई शिंदे यांनी शोक सभेत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या, यावेळी खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार ,नगरसेवक बालाजी खिल्लारे ,माजी नगरसेवक रमेश माळी ,ज्ञानोबा पाटील पवार, संचालक सुधाकर सातपुते,अशोक पाटील कळकेकर, सरपंच शंकर माने, सतीश कराळे ,सिद्धू वडजे, नागेश खांबेगावकर, प्रसाद जाधव ,अमोल गोरे,प्रा. राजेश गोरे, सचिन कल्याणकर, अशोक सोनकांबळे सह पत्रकार बांधव कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *