लोहा ; शैलेश ढेबंरे
लोहा तालुक्यातील पार्डी या गावातील शिवारात मधुकर पा पवार यांच्या शेतात जैव इंधन व सेंद्रिय खत या कामाचा कार्य शुभारंभ करण्यात आला.
या कंपनीचा ऊद्येश सदरील शेतकरी उत्पादक संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या तालुक्यातील बायॉफ्यूल्स जैविक इंधन व सेंद्रिय शेती उद्योगाचा विकास करणार सदरील उद्योगाच्या विकासाकरिता तालुक्यात जैवइंधन उत्पादन कारखाना लवकरच सुरु करण्यात येईल या कंपनीने चे मुख्य उद्दिष्ट इंधन शेती व सेंद्रिय शेती यामधून जास्तीत जास्त उत्पादन मिळवून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाची महिन्याचे उत्पन्न जास्तीत जास्त वाढवणे ही आहे ही कंपनी सेंद्रिय खताचा वापर करून पडीक जमीन लागवडीखाली आणते.
या कंपनीमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती होणार आहे तसेच ही कंपनी सभासद होणाऱ्या शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना वैयक्तिक वैद्यकीय शैक्षणिक क्रीडा व करमणूक इत्यादी सुविधा पुरवणार आहे.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित त्रिवेणी बायोक्लीन फ्युल्स चे डायरेक्टर संग्राम डुबुकवडे तसेच या कंपनीचे संचालक मारुतराव बाबवडे संभाजी धनकटवड संजय होळगे संजय टोकलवाड तसेच गुरुवर्य पुरण महाराज सोनखेडकर जमिनीचे मालक मधुकर पाटील पवार कंपनी चे सदस्य माधव दणकटवड रमेश ढेंबरे कल्याण कदम गणेश कदम गजानन क्षीरसागर व शेतकरी उपस्थित होते
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या कंपनीचे सभासद होऊन कंपनीला सहकार्य करावे शेतकऱ्यांनी दिलेल्या कचरा पासून आम्ही सीएनजी पीएनजी बनवू असं सांगीतले.
संग्राम डुबुकवडे
त्रिवेणी बायोक्लीन फ्युल्स चे डायरेक्टर