नांदेड – येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे उपक्रमशील कार्य कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य शिक्षकांचे प्रश्न धडाडीने सोडवण्यासाठी शिक्षक सेना नांदेड अग्रेसर असल्याचे मत राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज. मो. अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
राज्यशाखेची नांदेड जिल्हा आढावा आॕनलाइन झूम बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठवाडा अध्यक्ष प्रा. डॉ. गोविंद काळे, मराठवाडा सरचिटणीस बाळासाहेब राखे, राज्य समन्वयक नितीन चौधरी,मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, विभागीय पदाधिकारी विठ्ठल देशटवाड, जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत 1) उपशिक्षणाधिकारी , शिविअ , केंद्रप्रमुख यांची रिक्त पदे भरुन प्रभारी राज संपवावे, 2) शिक्षकांना १०, २०, ३० टप्पा वेतनश्रेणी मिळणे, 3) जुनी पेन्शन योजना लागु करणे , 4) शालेय विद्यार्थ्यांना सरसकट गणवेश मिळावे, 5) २४ वर्ष झालेल्या सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी देणे, 6) जिल्हा बदलीमध्ये ३० जुन बदली पात्र तारीख ग्राह्य धरणे, संवर्ग १ मध्ये ५३ वर्षे वयावरुन ५० वर्षे वयाची अट ठेवावी, एकल शिक्षक संवर्ग तयार करुन एकल शिक्षक यांना प्रत्येक शाळेवर प्राधान्य देणे, अवघड क्षेत्रात काम केले पण आता सोपे क्षेत्र झाले त्या बांधवाची सेवा अवघड मध्ये झाली म्हणून त्यांना होणाऱ्या बदल्या मध्ये संवर्ग ३ मधुन फार्म भरण्याची संधी देणे या मुद्दांचा समावेश करावा, 7) अवघड क्षेत्र निवडी मध्ये ज्या पात्र शाळा असुनही अपात्र झाले आहे त्यांची पुर्नरपडताळणी करुन नव्याने अवघड शाळा घोषीत करावे, 8) शिक्षकांचे जीपीफ व्यवहार आॕनलाइन करावे, 9)नांंदेड जि.प.मध्ये जे पदोन्नत मुअ व विषय शिक्षक पदे रिक्त आहेत ते तात्काळ भरावे, 10) शिक्षकांचे पगार एक तारखेला झाले पाहिजे,11)तुकड्यांना मान्यता देणे, 12) अघोषीत शाळांना घोषीत करणे, 13) आश्रम शाळांचाही पगार १ तारखेलाच व्हावा आदी मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जवळपास तीन तास चाललेल्या बैठकीत प्राथमिक व माध्यमिक शाखांचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. बैठकीच्या प्रारंभी कोवीड संसर्गजन्य रोगाचे निधन झालेल्या नांंदेड जिल्ह्यातील शिक्षक बांधव व शिक्षकसेनेचे कै. अरुण भारदे , अनिल हिवराळे सरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य पदाधिकाऱ्यांनी विभागीय पदाधिकारी ते तालुका पदाधिकारी पर्यंत संवाद साधला. जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचे विविध प्रश्न , अडीअडचणी , समस्या जाणून घेतल्या. कोव्हिड महामारीच्या काळात जेवण डब्बा, फराळ, अन्नधान्य किट, फळे वाटप या उपक्रमाबद्दल कौतुक केले. राज्यस्तरीय जे प्रश्न आहेत बदल्या बाबत जे दुरुस्ती मागण्या आहेत त्या शासनाकडे पाठवण्यात आले.रिक्त पदे भरणे व प्रभारीराज संपविणे पाठपुरावा चालु आहे. नांंदेड जिल्ह्यातील पदोन्नत मुअ , विषय शिक्षक पदे भरणे , निवडश्रेणी देणे , जीपीएफ स्लीप वेळेवर देणे, अवघड क्षेत्र निवडीमध्ये ज्या शाळा पात्र असूनही अपात्र ठरविण्यात आल्या त्या शाळेची पुर्नरपडताळणी करुन नव्याने जाहीर करण्यासाठी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांना बोलून प्रश्न तात्काळ सोडविण्यात येईल असे आश्वासन माननीय ज.मो.अभ्यकर साहेब यांनी जवळपास ३० ते ३५ मिनीटांच्या अध्यक्षीय भाषणात दिले . शिक्षक सेना नांंदेड अंतर्गत उर्वरित शाखा येणाऱ्या काळात पुर्ण करुन, सभासद नोंदणी वाढवावी, माध्यमिक , काॕलेज युनिट , अल्पसंख्यांक आघाडी पुर्ण करावी याबाबत चर्चा केली. नांंदेड जिल्ह्यातील शिक्षक बांधवाना होत असलेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा केली , अडीअडचणी मांडल्या , शिक्षक सेनेच्या केलेल्या दमदार कामाचा आढावा सादर केले व जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी शिक्षकांना त्रास झाला ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत व प्रश्न सोडवले आहे. वेळ प्रसंगी शिक्षक सेनेचा दणका दाखवला आहे. या बैठकीमुळे सर्व पदाधिकाऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले असून जुन्या पदाधिकाऱ्यांनाही संजिवनी प्राप्त झाली आहे. तसेच पुढील काळात अत्यंत हिरीरीने काम करण्याची प्रेरणा साहेबांनी दिली आहे, असे मनोगत व्यक्त केले. दरम्यान, नांंदेड जिल्हापदाधिकारी, परशुराम येसलवाड सर , रवि बंडेवार , मनोहर भंडेवार ,गोपाल बंड्रेवार , गंगाधर कदम , अविनाश चिद्रावार , गोविंद सुवर्णकार , संजय मोरे , गंगाधर ढवळे , आकाश राजूरे , राम माने , करेवार गंगाधर , कांबळे सर , सिताराम सुर्यवंशी , बालाजी केंद्रे , विलास नाईक , रमेश ढेमकेवाड , अनिल गवंडगावकर , अंकलवार सर , उत्तम शिंदे , ज्योतीताई शिंदे , सुकन्या खांडरे , पटवे मॕडम , जिल्ह्यातील जिल्हा , तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती होती. तर तालुका अध्यक्ष राम माने , एस वाय पाटील , धनंजय गिऱ्हे , देविदास जमदडे , बस्वराज मठवाले , संजय हामंद , बिलोली तर्फे पटवे मॕडम , किनवट – अनिल राठोड यांना तालुका आढावा सादर करुन तालुक्यातील समष्या , अडीअडचणी सांगितल्या. उर्वरित तालुक्याचा आढावा जिल्हाध्यक्ष अंबुलगेकर यांनी दिला तर माध्यमिक चे जिल्हाध्यक्ष तानाजी पवार यांचे तालुका पदाधिकारी यांनी तालुकानिहाय आढावा दिला.