नांदेड ; प्रतिनिधी
कोरोना लॉकडाऊनच्या काळात जिवाची पर्वा न करता सातत्याने सेवेत कार्यरत असणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रविण साले यांच्या वतीने दि.१८ रोजी सत्कार करण्यात आला.
१५ एप्रिल पासून तिसरे लॉकडाऊन नांदेड शहरात लावण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत भाजपा नांदेड महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” आधार गरजूंना” या उपक्रमांतर्गत २८००० डबे दिलीप ठाकूर,अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा ,संतोष ओझा,धीरज स्वामी,प्रशांत पळसकर, अमोल कुलथिया,कामाजी सरोदे,राजेशसिंह ठाकूर यांनी शहरातील विविध रुग्णालय परिसरात वितरित केले. त्यासोबतच सेवा ही संघटन या उपक्रमांतर्गत ६१ दिवसापासून दररोज लस घेणाऱ्या नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, मिनरल वाटर ,बिस्किट वाटण्याचे काम दिलीप ठाकूर यांची टीम करत आहे.याशिवाय लॉयन्सचा डबा या उपक्रमांतर्गत पस्तीस दिवसापासून दररोज डबे वितरण करण्यात येत आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन दिलीप ठाकूर,अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा ,संतोष ओझा,धीरज स्वामी,प्रशांत पळसकर, अमोल कुलथिया,कामाजी सरोदे,राजेशसिंह ठाकूर यांचा शाल,पुष्पहार व मोत्याची माळ टाकून खा. चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.
लॉयन्सचा डब्यात सोमवारी सेवानिवृत्त न्यायाधीश विजय कुलकर्णी व ॲड.बी. एच. निरणे यांच्यातर्फे प्रत्येकी दीडशे डबे,लक्ष्मीप्रिया अनुदत्त रायकंठवार हिचा वाढदिवसानिमित्त एकावन डबे वितरित करण्यात आले. प्रत्येकी पन्नास डबे देणाऱ्यांमध्ये विनय रेखावार पुणे,सौ. उषा व सत्यनारायण अग्रवाल यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तसेच कै. संदेश हरिभाऊ कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ सौ. अर्चना सनपूरकर यांचा समावेश आहे. मंगळवारी सौ. कांताबाई व माणिकचंदजी काला यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संदीप व मनिष काला यांच्यातर्फे ३०० व्यक्तींना पूर्ण जेवण,कै. शिवमुनीजी वानप्रस्थी शिवराम जिंदम यांच्या स्मरणार्थ ३२५ डबे,स्व.मनीषा नारायणलालजी कलन्त्री यांच्या स्मरणार्थ लॉ.
नारायणलालजी कलन्त्री यांच्यातर्फे १०० डबे,
सौ. उषा सत्यनारायण अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त ५० डबे,कै.श्रीमती शरयूबाई नारायणराव देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजीव देशपांडे यांच्यातर्फे ५० डबे,सौ मीना व ॲड.रमेश विनायकराव राजूरकर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ५० डबे रेल्वे स्टेशन व बस स्थानक, तसेच रस्त्यावरील गरजूंना वितरित करण्यात आले.
सेवा ही संघटन या उपक्रमाच्या ६१ व्या दिवशी नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेडच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष परमविरसिंघ बंटी मल्होत्रा यांच्या तर्फे मास्क, सॅनिटायझर, मिनरल वाटर व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप कंदकुर्ते,दिलीप ठाकूर, प्रशांत पळसकर ,अरुणकुमार काबरा हे उपस्थित होते. जनसेवेत झोकून देणाऱ्या दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.