The great poet Vamandada Kardak वामनदादांच्या गाण्यांनी माणूस जोडण्याचं काम केले – गंगाधर ढवळे

नांदेड – माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हीत व्हावे, असे गोड नाते तुझ्याशी जडावे, तुझ्या संकटाशी इथे मी लढावे अशी माणसाच्या जगण्याची संरचना मांडणाऱ्या महाकवी वामनदादा कर्डक The great poet Vamandada Kardak वामनदादा कर्डक Vaman dada Kardakयांची गाणी आजही प्रेरणादायी आणि अनुसरणीय आहेत. वामनदादांनी आपल्या गाण्यातून बाबासाहेबांना उलगडून दाखवत असतांनाच क्रांतिकारी पुनर्रचनेचा विचार दिला. आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देत वामनदादांच्या गाण्यांनी माणूस जोडण्याचं काम केले असे प्रतिपादन येथील साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी केले.Vaman dada Kardak

ते महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत बोलत होते. यावेळी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, बि.एस.गोडबोले, निर्मलाबाई पंडीत, छायाबाई थोरात, शोभाबाई गोडबोले, संयोजक सुभाष लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहार समितीच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांचा १७ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रारंभी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. धूप व दीप प्रज्वलन झाल्यानंतर सामुदायिक त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर बोलताना ढवळे म्हणाले की, Vaman dada Kardakवामनदादाच्या गितांनी समग्र संघर्षाची प्रेरणा दिली. कार्यकर्त्यांना तुफानातील दिवे अशी उपमा देऊन कोणत्याही संकटाला तोंड देण्याची सूर्यकुलीन उर्जा दिली. वामनदादांची असंख्य गाणी आजही मनावर गारूड करुन आहेत. त्यांच्या तालमीत अनेक कवी, गायक, गीतकार तसेच संगितकार तयार झाले. आज दादांच्या कुटुंबासह निस्वार्थ भावनेने आंबेडकरी चळवळ गीतांच्या माध्यमातून पुढे नेणारे अनेक कवी, गायक कष्टप्रद जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे, आर्थिक मदत करावी असे आवाहन साहित्यिक गंगाधर ढवळे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

दरम्यान, वामनदादांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच उपस्थितांकडून वामनदादाच्या प्रतिमेला Vaman dada Kardakपुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी दादांच्या आठवणी सांगितल्या. लहान बालकांनी गीते गावून कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यक्रमासाठी गंगाधर शिराढोणकर, भिमराव सातोरे,राहुल दुधमल,अवंती कदम, राहुल कदम, हर्षदीप लोखंडे, संकेत गायकवाड, विनोद कापुरे, सोनू गोडबोले, अनिकेत कापुरे, अभिषेक थोरात, उत्तम नवघडे यांच्यासह कोरोनाचे नियम पाळून महिला व पुरुष, बालक – बालीका उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *