भारतीय बौद्ध महासभा कंधार शाखेच्यावतीने बौद्ध द्वार विहार येथे 2565 वी बुद्ध जयंती साजरी

कंधार प्रतिनिधी

कंधार येथील भारतीय बौद्ध महास भा शाखा कंधार च्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 जयंती तथा बुद्ध पौर्णिमा कंधार येथील बुद्ध विहार येथे दिनांक 26 मे रोजी साजरी करण्यात आली.

कंधार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थितांनी अभिवादन केले.

तसेच येथील बौद्ध द्वार बुद्ध विहार येथे समाज बांधवांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधवांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *