कंधार/ प्रतिनिधी
तालुक्यातील बाळंतवाडी तांडा येथे खदणीत एक नवविवाहितेचा मृतदेह आढळुन आला. बुधवारी (दि26 ) पहाटे6 वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
सुनीता गजानन जाधव (19. रा बाळंतवाडी तांडा) असे या मृत महिलेचे नाव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार
सुनीता जाधव मंगळवारी रात्री पासून घरातून बेपत्ता होती. तिच्या पती व घरातील नातेवाईक शोधा शोध केली असता. तिचा मृतदेह गावाशेजारील खदणीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कंधार पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक झुंजारे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांनच्या मदतीने मृतदेह काढून कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला.
मृतदेहाची अहवेलना
सुनीता हिचा मृतदेह दुपारी 2वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला होता. परंतु ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रात्री उशिरापर्यंत मृतदेह स्टेचर पडून होता.
या घटनेची नोंद कंधार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत