नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांचा कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांचा कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज शुक्रवार दि.२८ मे रोजी सत्कार करण्यात आला.

कंधार येथिल हरीहरराव भोसीकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते.हरीहरराव भोसीकर यांची  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा पासून त्यांचा हा पहीलाच कंधार दौरा होता.यावेळी कंधार पत्रकार संघाच्या वतीने सचिव सचिन मोरे यांच्या पुढाकारातुन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार प्रा,सुभाष वाघमारे ,माधव भालेराव,एस.पी.केंद्रे ,दयानंद कदम,सय्यद हबीब आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *