भारतीय जनता पार्टी कुरुळा शाखेच्या वतीने डॉक्टर व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

देशाचे नेतृत्व नरेंद मोदी सरकार ला आज सात वर्ष पूर्ण होत असल्याने भारतीय जनता पार्टी कुरुळा तालुका कंधार शाखेच्या वतीने डॉक्टर व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा आज रविवार दि.३० मे रोजी सत्कार करण्यात आला.

सध्या करोणा महामारी मध्ये स्वताचा जीव धोक्यात घालून अहोरात्र जनतेला सेवा देणारया कुरुळा परिसरातील सर्व डॉक्टर व आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या कर्मचारी यांचा भारतीय जनता पक्ष कुरुळा यांच्या कडून छोटासा सत्कार सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुळा येथे आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवा भाऊ चिवडे (उपसरपंच ग्रामपंचायत कुरुळा)व सत्कार मूर्ती डॉ. केंद्रे साहेब, डॉ, प्रवीण जाधव साहेब (प्राथमिक आरोग्य अधिकारी), डॉ. चंद्रकांत थोटे साहेब, डॉ. कोंडलवाडे साहेब, डॉ तुपकर साहेब , व सर्व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुरूळा तसेच उपस्थिती श्री वैजनाथ पाटिल जाधव, दीपक पाटील गोरे, तुकाराम पवार ,माऊली भाऊ श्रीमंगले,आकाश चीवडे, संभाजी जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *