PM Cares For Children’ योजना चला जाणून घेऊया

★ ज्या मुलांच्या पालकांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला असेल, त्यांना PM-CARES for Children योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार मदत करणार आहे, प्रत्येक मुलासाठी 10 लाख रुपयांचा निधी PM Cares मधून राखीव ठेवण्यात येणार आहे, ज्यातून ती मुलं 18 वर्षांची झाल्यावर त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.

★ 18 वर्षानंतर दर महिन्याला केंद्र सरकार या ‘कॉर्पस’ मधून या मुलांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे ज्यातून त्यांचे कॉलेज व पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी होणारे खर्च (एक प्रकारे पॉकेट-मनी) ती मुलं यातून करू शकतील. 23 व्या वर्षी या प्रत्येक मुलाला 10 लाख रुपये एक-रकमी देण्यात येणार आहेत जे त्या मुलांनी कसे खर्च करायचे यावर सरकारच्या काहीही अटी नसतील.

★ 10 वर्षांच्या आतील मुलांना जवळच्या केंद्रीय विद्यालयात मोफत शिक्षण दिलं जाईल किंवा RTE च्या कोट्यातून प्रायव्हेट शाळेत शिक्षण दिलं जाईल, ज्याची फी PM Cares मधून दिली जाईल. या सर्व मुलांचा युनिफॉर्म, वह्या-पुस्तके याचा खर्च PM Cares मधून केला जाईल.

★ 11 ते 18 वयोगटातील मुलांना केंद्र सरकारच्या सैनिकी शाळा आणि नवोदय विद्यालयांत मोफत शिक्षण आणि राहायची व्यवस्था जाईल, ज्याचा संपूर्ण खर्च PM Cares मधून केला जाईल, अशा मुलांनी Higher Education साठी कर्ज घेतले तर त्या कर्जाचे संपूर्ण व्याज PM Cares मधून भरले जाईल.

★ सरकारच्या सध्या अस्तित्वात असलेल्या स्कॉलरशिप स्कीम्समध्ये अशी मुलं येत नसतील, तर त्या स्कॉलरशिप एवढी रक्कम PM Cares मधून या मुलांना देण्यात येईल.

★ आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत (PM-JAY) या सर्व मुलांना शामिल करण्यात येईल आणि प्रत्येक मुलाला 5 लाख रुपये एवढे हेल्थ-इन्श्युरन्स कव्हर लागू असेल. १८ वर्षांपर्यंत त्यासाठी लागणारा प्रीमियम PM Cares मधून भरण्यात येणार आहे.

साभार – वेद कुमार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *