लोहा ; प्रतिनिधी
टेळकी की ता.लोहा येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंतप्रधान म्हणूण कारकिर्दीस 30 मे रोजी सात वर्ष पुर्ण झाले आहेत .सेवा ही संगठन या शिर्षका अंतर्गत भाजपा महीला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या स्वखर्चाने सिमेंट ची बाक बसवून दिले तसेच जिल्हा परिषद चा 7 लक्ष निधी चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सेवाकार्य म्हणून गावातील ज्येष्ठ नागरिकांना रोपट्याचे वाटप करून हा कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी संभाजीनगर च्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अमृता पालोदकर, लोहा पंचायत समिती सभापती आनंदा पाटील शिंदे ,शंकरराव पाटील ढगे, माजी उपसभापती लक्ष्मण बोडके ,वीरभद्र राजुरे,विलास पाटील रिंगे ,साईनाथ पाटील टरके, संजय पाटील मोरे, बंडू पाटील वडगावकर ,रंगराव पाटील लोंढे , सरपंच करुणाताई मोरे, उपसरपंच संदीप देशमुख विजय माला मोरे, राजेश गोरे, नारायणराव मोरे ,गोपाळ गुळवाड, हुसेन शेख ,चांदोजी कांबळे, शंकरराव मोरे ,माधवराव मोरे ,बाळुमहाराज, साहेबराव मोरे, सुनील मोरे, संभाजी मोरे ,गजानन मोरे, तुकाराम मोरे, शिवाजी मोरे ,ग्रामसेवक मामीनवार सह गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते.