जिल्हा जात पडताळणी कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी..!

नांदेड ; प्रतिनिधी

राजमाता अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम होत्या. पराक्रम, प्रशासन आणि प्रजाहितवादी कार्याची सांगड घालून त्यांनी आदर्श शासक म्हणून लौकिक प्राप्त केला. त्यांनी केलेले न्यायिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी दिनांक ३१ मे २०२१ रोजी. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे मा. श्री. आ. ब. कुंभारगावे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व कोविड १९ च्या अनुषंगाने शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करून, जात पडताळणी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली..!

याप्रसंगी,
           मा.श्री. आ. ब. कुंभारगावे, एस. जे. रणभीरकर, ए.एम. झंपलवाड, बि.एम. शिरगिरे, संजय पाटील, सोनू दरेगावकर, विनोद पाचंगे, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे आदी उपस्थित होते..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *