बुद्ध धम्म संघाच्या वाढीसाठी अपत्य दान करा – भंते श्रद्धानंद

नांदेड – बुध्दाने बौध्द उपासकांसाठी दहा पारमिता सांगितल्या. दानवृत्तीला म्हणजेच दानाला बौध्द धम्मात फार महत्व आहे. दान करणे हा श्रेष्ठ गुण होय. दान केल्याने मनाची आसक्ती कमी होते. घेण्याएवजी माणूस देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते इतरांच्या कल्याणार्थ म्हणून देण्याचे शिकतो. यातून त्याग करण्याची प्रवृत्ती वाढते. जे जवळ आहे ते माझे नाही व जे माझे नाही ते इतरांना दिले पाहिजे. धान्य, वस्तू तसेच आर्थिक दानाबरोबरच बुद्ध, धम्म आणि संघाच्या वाढीसाठी अपत्य दान करा असे आवाहन भंते श्रद्धानंद यांनी केले. जगातील काही बौद्ध राष्ट्रांत भिक्खू संघाला अपत्य दान करण्याची प्रथा आहे. धम्मप्रचार आणि प्रसारासाठी भिक्खू संघाचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यासाठी प्रत्येक बौद्ध कुटुंबाने एक मुलगा किंवा मुलगी भिक्खू संघाला दान दिली पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी भिक्खू संघातील भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुदत्त, भंते सुमेध, भंते पट्टीसेन, माताजी शाक्यन ज्योती, सरपंच दगडू काकडे, पोलिस पाटील भुजंगराव काकडे, माजी सरपंच प्रल्हाद काकडे, उपसरपंच दत्तराव काकडे, साहित्यिक गंगाधर ढवळे, शामराव लोणे, भुजंग लोणे, निवृत्ती लोणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


            तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या भिक्खू संघाच्या हस्ते रोडगी येथील बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना, नामकरण तथा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलतांना साहित्यिक गंगाधर ढवळे म्हणाले की, तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. जगात दुःख कायम आहे, हे बुद्धाने सांगितले. त्याच्या निवारण्याचा उपायही सांगितला. बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो. धम्म म्हणजे नीति होय. नीतिचा विकास म्हणजेच दुःखाचे निरोधन आहे. दुःखावर मात करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटकाळातही बुद्धाचे विचार मार्गदर्शक ठरतात. 

             तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ व्या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथे महामाया प्रजापती बुद्ध विहाराची स्थापना भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आली. बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भंते सुदर्शन आणि भंते श्रद्धानंद यांच्या हस्ते झाली. गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प, दीप‌ आणि धूपपूजन झाल्यानंतर बुद्ध विहाराचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला. बुद्ध विहाराचे नाव महामाया प्रजापती बुद्ध विहार असे ठेवण्यात आले. यावेळी बुद्धं सरणं गच्छामीचा स्वर निनादला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधीवत बुद्ध वंदना, त्रिसरण पंचशील, परित्राण पाठ संपन्न‌ झाले. त्यानंतर उपासक उपासिकांकडून भिक्खू संघाला चिवरदान आणि पाच हजार रुपयांचे आर्थिक दान दिले. भिक्खू संघाने या बुद्ध विहारात दररोज वंदना घेतली जावी, दहा पारमिता पाळाव्या, उपोसथ व्रत अंगिकारावे असे आवाहन उपस्थितांना केले. 

             कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुजंग लोणे यांनी केले.‌ प्रास्ताविक शामराव लोणे यांनी तर आभार निवृत्ती लोणे यांनी मानले. यावेळी दत्ता लोणे, हरी लोणे, हरी कोकरे, शंभुराज सोनाळे, गंगाबाई लोणे, राधाबाई लोणे, जयश्री कोकरे, वंदना कोकरे, अनुसया सोनाळे, राजश्री सोनाळे, शोभा सोनाळे, आशा कोकरे, सुनंदा कोकरे, धोंड्याबाई कोकरे, मनिषा कोकरे, विशाखा कोकरे, ज्योती लोणे, रत्नमाला लोणे, रंजना लोणे, प्रकाश लोणे, शारदा लोणे, शितल लोणे, ममता लोणे, रंजना कोकरे, सोपान कोकरे, सुनिता लोणे, सविता लोणे, सुमन लोणे, अनिता लोणे, छाया लोणे, सयाबाई लोणे, कमलबाई लोणे, विमलबाई लोणे, प्रयागबाई लोणे, शालिनी लोणे, ऋतुजा लोणे, सोनी लोणे, प्रमोद लोणे, गंगाधर कोकरे, विशाल लोणे, राजू कोकरे, राहुल लोणे, चंद्रकांत सोनाळे, साहील कोकरे, अजय लोणे, संदेश लोणे, अक्षय लोणे, शुभम लोणे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *