नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाईन पद्धतीने काव्यपौर्णिमा आयोजित करण्यात आली होती. काव्यपौर्णिमा मालेतील ही ४१ वी पौर्णिमा असून वैशाखी पौर्णिमेचे औचित्य साधून गुगलमीट या अॅपवरुन राज्यभरातील कवींना सहभागी करून घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या काव्यपौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी बाबुराव पाईकराव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आकाश प्रकाशन युट्युब चॅनलचे संचालक पांडूरंग कोकुलवार, डॉ. दिलीप लोखंडे, मंडळाचे कार्याध्यक्ष मारोती कदम, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, काव्य पौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खा. राजीव सातव, आ. रावसाहेब अंतापूरकर, डॉ. गणेश शिंदे, ज्येष्ठ कवी दु. मो. लोणे, कथाकार प्रदिप धोंडिबा पाटील, इतिहासतज्ज्ञ डॉ. अनिल कठारे, आंबेडकरी विचारवंत अक्रम पठाण, भदंत सत्यशिल महाथेरो यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ कवी पांडूरंग कोकुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त कविसंमेलन घेण्यात आले. त्यात डॉ. दिलीप लोखंडे, मारोती कदम, जय निरपणे, रणजीत गोणारकर, अनुरत्न वाघमारे, गोविंद बामणे, आकाश कोकुलवार, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वैद्य वागरे, बालाजी गोरे, बाबुराव पाईकराव यांनी सहभाग नोंदवला.
दरम्यान, सप्तरंगी साहित्य मंडळाची धुळे नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी डॉ. दिलीप लोखंडे यांच्यावर सोपवण्यात आली. तशी घोषणा मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांनी केली. प्रास्ताविक गंगाधर ढवळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांनी केले तर आभार मारोती कदम यांनी मानले. तंत्रसहाय्य इंजि. आकाश कोकुलवार यांनी दिले. कार्यक्रमासाठी शंकर गच्चे, कैलास धुतराज, प्रशांत गवळे, शेख जाफरसाब, प्रकाश ढवळे, सुभाष लोखंडे, भैय्यासाहेब गोडबोले, राजेश गायकवाड, लक्ष्मण लिंगापुरे, भीमराव ढगारे, दिगंबर श्रीकंठे, रविराज भद्रे, सतिश शिंदे यांनी परिश्रम घेतले.