आज दिनांक ३१.५.२०२१ रोजी खरीप हंगाम आढावा बैठक कंधार व लोहा तालुक्याचे आमदार माननीय श्यामसुंदर मशिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय लोहा येथे आयोजित करण्यात आली होती सदरील आढावा बैठकीस तालुकास्तरीय सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगांवकर , तहसीलदार लोहा विठ्ठल परळीकर, तहसीलदार कंधार व्यंकटेश मुंढे,नायब तहसीलदार विजय चव्हाण दोन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख उपस्थित होते.
तालुक्यात या योजनेअंतर्गत एकूण ४०७० शेतकऱ्याने ऑनलाइन अर्ज केले होते लॉटरी पद्धतीने यापैकी ३८० शेतकऱ्याची निवड झाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत एकूण २१६ लाभार्थ्यांची तर राष्ट्रीय गळितधान्य अभियानांतर्गत १६४ लाभार्थ्याची निवड झाली याअंतर्गत कडधान्य बियाणे १०.४४ क्विंटल बियाणे अनुदानावर तर गळीतधान्य अंतर्गत १४४.४० क्विंटल बियाणे वितरण करण्यात येणार आहे.