कंधार ;प्रतिनिधी
आपल्या देशात अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. नियमित वयोमानानुसार प्रत्येक क्षेत्रातील सेवा देणारे सरर्थवीर सेवापुर्ती करुन सेवानिवृत्त होत असतात. आज श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार येथील इंग्रजी विषयाचे आदर्श प्राध्यापक,योग शिक्षक, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारे,संघटन कौशल्यात निपुण, शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवणारे,मित्रांचा घोळका सोबत घेऊन चालणारे, आरोग्यासाठी योग-प्राणायाम करुन चीरतरुण ठेवणे किती महत्वाचा हे कृतीने दाखवणारे व्यक्तीमत्व मा.नितीन रामरावजी कुलकर्णी सर यांना आयुष्यातील दुसऱ्या ईनिंगसाठी सदिच्छा देतांना सेवापुर्ती काव्य लिहिले आहे.
अजोबाश्री गुंडेरावांची अनुकंपा,
मेथी मिळकूंदा येथील कुलकर्णी,
स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारास!
माता सिंधुताई अन् पिता रामराव,
आदर्श आहेत तुमच्या जीवनास!
योग-प्राणायामचा आभ्यास करुन,
चीरतरुण दिसता सेवापुर्ती दिनास!
जय-जवान,जय-किसान ब्रीदवाक्य,
प्रेरणादायी आहेच तुमच्या यशास!
विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवून,
कारणीभूत तुम्ही त्यांच्या उत्कर्षास!
संघटन कौशल्यात निपुणच नितीन,
अधिश्वरी सौ.शालीनीच्या संसारास!
भविष्यात शिक्षक आमदारच व्हावे,
त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास!
कन्या!रत्न सौ. पुजा मॅनेजमेंट तज्ञ,
शोभिवंतच तुम्हा दोघांना हमखास!
श्री शिवाजी हायस्कूल कंधार शाळा,
काव्यात्मक शब्दसदिच्छा देते खास!
आज कोविड महासंकट असल्यामुळेच संस्थेचे मान्यवर येवू शकत नसल्यामुळेच मिट व्दारे छोटेखानी कार्यक्रमात त्यांना शाळेत निरोप १० वाजता देवून सदिच्छा देणार आहेत.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारच्या वतीने सदिच्छा!


