माजी मुख्यमंत्री कृषिप्रधान देशातले कृषीकोहिनूर कै.वसंतराव नाईक साहेबांची यांच्या अथक परिश्रमातून संशोधकांच्या बुध्दीच्या बळावर विज्ञानाने यंत्राचा शोध लावला.पहिल्या प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करून हे शब्दबिंब जुन्या बैलगाडी अन् बैलजोडीचा विसर पडला.म्हणून बैलगाडीचे मोठेपणा मांडता आला. ही बैलगाडी शेतकरी राजांचा मानसन्मान वाढविण्यास कारणीभूत असायची. हल्लीच्या मोबाईल संस्कृती जगभरात पसरली असतांना खिळी,साप्ती,जु,नाडा,बुदले,दांडी,कासरा,वेतन,ढकली,आक,कुन्नी, यासारखे शब्द सध्याच्या अधुनिक पिढीत रुजविण्यास हे शब्दबिंब लिहून आपल्या पुढे मांडण्याचा अल्पसा प्रयत्न माझ्या लेखनीतून तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा. दि.१\६\२०२१ चे गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींचे शब्दबिंब आपणा सर्वांना वाचनासाठी!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार