लोहा शहरातील प्रभाग क्रमांक २ च्या विकासासाठी सदैव कटिबद्ध- संभाजी पाटील चव्हाण

लोहा/श प्र शिवराज दाढेल लोहेकर.

शहरातील अतिशय धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा कर्तव्यदक्ष नगरसेवक प्रतिनिधी संभाजी पाटील चव्हाण यांनी आपला राजकीय दबदबा कायम ठेवला आहे. नुकताच त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. प्रसंगी बोलताना संभाजी पाटील चव्हाण यांनी प्रभाग दोन च्या सुनियोजित व सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे विकास गंगा खेचून आणली असुन प्रभाग क्रमांक २ च्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. रस्ते, नाल्या, दिवाबत्ती पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामे पूर्णत्वास नेली असल्याचे मत व्यक्त केले.


प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी शाल पुष्पहार पेढा भरवून शिवसेना युवा नेते बाळासाहेब कह्राळे अभिष्ठचिंतन केले.नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी,उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,केशवराव चव्हाण मुकदम सह सर्व सन्माननीय नगरसेवक, शिक्षक नेते विठुभाऊ चव्हाण, जेष्ठ शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण, चेअरमन बालाजी चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पवार,ज्येष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे,मोहन पवार,संजय कहाळेकर,संतोष तोंडारे,मारोती चव्हाण तुकाराम दाढेल.साहित्य सम्राट प्रतिनीधी शिवराज दाढेल लोहेकर यांच्या सह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *