शेकापूर येथिल महात्मा फुले मा.व उच्च मा.विद्यालयाला यशवंत काँलेज नांदेड चे प्राचार्य गणेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.

कंधारः- प्रतिनिधी
शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला माजी प्रो.कुलगुरू प्राचार्य गणेश शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली.

जागतिक पर्यावरण दिना चे निमित्ते साधून यशवंत काॅलेज नांदेड चे प्राचार्य श्री गणेश शिंदे यांनी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांच्या हस्ते निसर्ग रम्य काॅलेज परिसरात वृक्षारोपण करून त्यांना वृक्षरोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .

या प्रसंगी त्यांच्या सोबत प्रा.मुकुंद बोकारे सर ,प्रा.मिरकुटे सर, ग्रंथपाल श्री वडजे सर,श्री वानखेडे सर, प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे ,पर्यवेक्षक केंद्रे व्ही.के. , अमितभय्या केंद्रे अदिसह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *