पुर्वी ओट्यावर गप्पा-गोष्टी, हृदये हृदयांशी करीत होते! सध्याला शरीराने ओट्यावर, | मोबाईलचा वापर अंतर देते!
सुखदुःखाची विचारपुस पुर्वी, माणुसकीचे नाते जपत होते! मोबाइलमध्ये गुरफटल्यानेच, बोलणारी नाती मुकीमैद होते!
सामाजिक दृष्टिकोनातली चर्चा, | गाव चावडीवर करीत होते! | सोशल मिडियाच्या नादापायी, | जवळ बसणाऱ्यांना विसरते!
बोलण्याची आदानप्रदान सध्या, मोबाइलच्या वळचणीला दिसते! गतकाळातील वैश्विक आनंदच, तरुणाई मोबाईलवर सर्च करते?
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी क्रांतिभुवन बहाद्दरपुरा