नांदेड ; प्रतिनिधी
सहयोग कँपस येथे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,आ. राम पाटील रातोळीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछेडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्यबापू देशमुख, मनपा विरोधी पक्षनेते दिपक सिंह रावत ,संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, प्राचार्य बालाजी गिरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती .गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले दिलीपभाऊ यांचे नाव मराठवाड्यात सर्वपरिचित आहे. सहा शैक्षणिक पदव्या घेतलेले भाऊ सदैव समाजसेवेत व्यस्त असतात. वर्षभरात एक दोन नव्हे तर तब्बल पंच्याहत्तर उपक्रम ते चालतात. गेल्या वीस वर्षापासून त्यांनी आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय विराट कवी संमेलनाची ख्याती संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा जास्त रुग्णांना लोकसहभागातून त्यांनी जेवणाचे डबे पुरविलेले आहेत. आतासुद्धा दररोज ५० डबे रुग्णालयात देण्यात येतात. कोरोना तिसऱ्या लॉकडाऊन च्या काळात सतत छप्पन दिवसापासून गरजूंना जेवण पुरवित असल्याचे पाहून देश-विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याशिवाय थंडीत कुडकुडत असलेल्या २०२१ निराधारांना ब्लॅंकेट रुपी मायेची ऊब त्यांनी दिली. ५७ रक्तदान शिबिरातून ६३०० रक्ताच्या बॉटलचे संकलन केले. वेडसर, बेघर, उपेक्षितांची दाढी कटिंग करून त्यांना नवीन कपडे जेवण व शंभर रुपये बक्षिसी देण्याचा त्यांचा कायापालट हा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. विविध वृत्तपत्रातून त्यांचे साप्ताहिक लेख नियमित प्रसिद्ध होतात.या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना मराठवाडा भूषण, नांदेड का सांता, जिजाऊ रत्न, शान ए नांदेड यासारख्या ५१ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना योद्धा म्हणून वीर सैनिक ग्रुप तसेच नमोस्तुते समर्पण संस्कृती प्रतिष्ठान यांच्या सह महाराष्ट्रातील २२ संस्थांनी त्यांचा नुकताच गौरव केला आहे. दिलीपभाऊंच्या कार्याची दखल त्यांचा प्रत्यक्ष परिचय नसणाऱ्या देशभरातील अनेक स्वयंसेवी संस्था घेत असल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
(छायाः करणसिंह बैस, ज्ञानेश्वर सुनेगावकर, नरेंद्र गडप्पा, सचिन मोहिते, सचिन डोंगळीकर, धनंजय कुलकर्णी, व्यंकटेश वाकोडीकर)