बिलोली:
सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते,सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाउन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा. यासाठी वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र भर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले त्यामुळे बिलोली शहरात ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डफडे बजावली आंदोलन करण्यात आले व बिलोली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
यावेळी निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे नेते धम्मदिप गांवडे, युवा नेते विजय प्रचंड,धम्मपाल जाधव, नागेश सवईशिखरे,शिवराज सुर्यकार, शेषराव वाघमारे, पवनकुमार पाटील, लक्ष्मण लंके नागेश विचारे यांचे निवेदनावर सहया आहेत