नांदेड दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 815 अहवालापैकी 38 अहवाल कोरोना बाधित आले आहेत., आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 7 तर अँटिजेन तपासणीद्वारे 31 अहवाल बाधित आहेत.
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 31 एवढी झाली असून यातील 88 हजार 227 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 342 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 900 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, मुखेड तालुक्यांतर्गत 1, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 1, हदगाव 1 तर अँटिजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 8, लोहा 1, नांदेड ग्रामीण 4, मुदखेड 1, कंधार 13, परभणी 1, किनवट 2, यवतमाळ 1 असे एकूण 38 बाधित आढळले.
आज जिल्ह्यातील 54 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3, मुखेड कोविड रुग्णालय 2, बिलोली तालुक्यातर्गंत 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2, देगलूर कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 5, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 37, हदगाव कोविड रुग्णालय 3 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आज 342 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2, किनवट कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 241, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 49, खाजगी रुग्णालय 10 व्यक्ती उपचार घेत आहेत.
आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 124, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 130 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 84 हजार 695
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 82 हजार 179
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 31
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 227
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 900
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.91 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-2
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-160
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 342
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2
00000