माळाकोळी ; एकनाथ तिडके
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार आज माळाकोळी येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर मुरकुटे व प्रदेश कार्यकारणी सदस्य कृष्णा केंद्रे यांच्या नेतृत्वात माळाकोळी येथील शिवाजी चौक या ठिकाणी “चक्का जाम आंदोलन” करण्यात आले.
यावेळी वीस मिनिटे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठ प्प होती.
या आंदोलनात भाजप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर मुरकुटे प्रदेश कार्यकारणी सदस्य कृष्णा केंद्रे सरपंच प्रतिनिधी मोहन काका शूर, केशव तिडके, तुकाराम चाटे, अर्जुन बुळगुंडे लक्ष्मण केंद्रे, हनुमंत केंद्रे सुभाष केंद्रे, चंद्रकांत केंद्रे रामराव केंद्रे, राजू दहिफळे सागर तिडके आत्माराम मुस्तापूरे मनोज कागणे, वसंत केंद्र ऋषिकेश केंद्रे केरबा केंद्रे, संघपल कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.यावेळी ओबीसी आरक्षणासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी करत राज्यसरकारचा केला यावेळी सरपंच मोहन शूर यांनी “आपण पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत ओबीसी आरक्षणासाठी सदर आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे सांगितले”, शिवाय हनुमंत केंद्रे यांनी एकूण ओबीसी आरक्षणाची सध्याची परिस्थिती विशद केली व भविष्यात शैक्षणिक व नोकरीचे आरक्षण जाण्याअगोदर ओबीसी समाजाने जागे होण्याचे आवाहन केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक संतोष गित्ते यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.