कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील गुट्टेवाडी येथिल १६ वर्षीय शाळकरी विद्यार्थी आटोने गावातुन उमरगा खोजा येथे खाजगी शिकवणीसाठी जात असताना रविवार दि.२७ जुन रोजी सकाळी आठ ते ९ च्या दरम्यान आटो चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन अपघात झाला त्यामध्ये करण विठ्ठल गुट्टे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून चार मुले जखमी झाले आहेत.
पुंडलीक विद्यालय हाडोळी येथे इयता १० वी वर्गात शिकणारा कंधार तालुक्यातील गुट्टेवाडी येथिल मयत करण विठ्ठल गुट्टे व जखमी साईनाथ बापुराव वाघमारे ,हनमंत जयवंत गुट्टे,कु.वैष्णवी तुकाराम गुट्टे,राजश्री उत्तम गुट्टे, यांच्या सह अन्य मुले गुटेवाडी ते उमरगा खो. येथे खाजगी शिकवणी साठी दररोज जात असतात.दि.२७ जुन रोजी ते सकाळी गुटेवाडी ते उमरगा खो. येथे खाजगी शिकवणी साठी जात होते. आटो क्रमांक एमएच 23 एक्स 3810 वरील आटो चालकाचा ताबा सुटल्याने अपघात होऊन मयत करण विठ्ठल गुट्टे चा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी कंधार पोलीसात रात्री उशीरा पर्यत गुन्हा नोंद प्रक्रिया चालु होती.कंधार येथिल ग्रामिण रुग्णालयात मयताचे शवविच्धेदन करण्यात आले.तर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले.