आमदार शामसुंदर शिंदे लवकरच राष्ट्रवादीत जाणार …! पत्रकार परीषदेत दिली माहीती

नांदेड ; प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष म्हणून ओळखला जात असून तळागाळातील गोरगरीब कष्टकरी दीनदुबळ्यांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष सदैव तत्पर असून माझ्या लोहा कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले मला राजकारण करावयाचे नसून लोहा कंधार मतदार संघातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी दीनदुबळ्या जनतेची सेवा करायची असल्याचे शिंदे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

लिंबोटी धरणाचे पाणी लातूरला कदापी जाणार नाही ;जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आमदार शामसुंदर शिंदे यांना आश्वासन

नांदेड (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी काल रविवारी लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नांदेड येथील स्मिरा निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते नामदार जयंत पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी लोहा, कंधार मतदार संघातील सिंचना विषयी नामदार जयंत पाटील व आमदार शिंदे यांच्या मध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी आमदार शिंदे यांनी नामदार जयंत पाटील यांना निवेदन देऊन विनंती केली की लोहा तालुक्याचे भुषण असलेल्या उर्ध्व मानार लिंबोटी धरणातून प्रस्तावित लातूर शहराला पाणीपुरवठा करण्याच्या निर्णयाचा आमदार शिंदे यांनी यावेळी कडाडून विरोध करून कोणत्याही परिस्थितीत उर्ध्व मानार लिंबोटी धरणाचे पाणी लातूर शहरासाठी जाऊ देऊ नका म्हणून निवेदना मार्फत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे विनंती केली असता नामदार जयंत पाटील यांनी आमदार शिंदे यांना बोलताना कोणत्याही परिस्थितीत लिंबोटी धरणाचे पाणी लातूर शहरासाठी देणार नसल्याची ग्वाही दिल्याने लिंबोटी च्या पेटलेल्या पाणीप्रश्नावर जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पडदा पडला आहे ,तालुक्यातील लिंबोटी धरणातून लातूर शहरासाठी कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर होणार असल्याचे कळताच लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबई गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन लिंबोटी धरणाचे पाणी लातूरला जाऊ देऊ नका म्हणून विनंती केली होती, लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांचे भाग्य या लिंबोटी धरणावर अवलंबून असून जर या धरणाचे पाणी लातूर शहराला दिले तर लोहा कंधार मतदार संघाचे लवकरच वाळवंट होऊन शेतकरी कायम उद्ध्वस्त होईल अशी महत्त्वपूर्ण बाजू आमदार शामसुंदर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मांडली होती. काल रविवार दिनांक 27 जून रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांच्या निवासस्थानी सकाळी सदिच्छा भेट दिली असता लिंबोटी धरणाचे पाणी कोणत्याही परिस्थितीत लातूरला जाऊ देणार नसल्याचे नामदार जयंत पाटील यांनी आमदार शामसुंदर शिंदे यांना आश्वासन दिले .यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, यशपाल भिंगे ,रोहित पाटील शिंदे, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, आनंद पाटील, भोकर चे तालुकाध्यक्ष विश्वंभर पवार, दत्ता पाटील ,शेकाप पक्षाचे जिल्हाध्यक्ष योगेश नंदनवनकर, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *