नांदेड ; प्रतिनिधी
नांदेड येथे आज दि.२७ जुन रोजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार शहरात लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून स्मारक उभे करण्यात यावे म्हणून सामाजीक न्याय मंत्री तथा बिडचे पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांच्या कडे निवेदनाद्वारे विनंती केली.
सामाजीक न्याय मंत्री तथा बिडचे पालकमंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांनी लवकरच कंधार शहरात माझ्या स्वताच्या निधीतून जागा उपलब्ध करून स्मारक उभे करणे म्हणुन आश्र्वासन दिले.
त्या बदल माजी सैनिक संघटना नांदेड च्या वतीने साहेबांचे जाहीर आभार मानले असल्याची माहीती माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिली.