कंधार ; तालुका प्रतिनिधी
सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत समाज कल्याण विभाग जि.प.नांदेड व अलिंपको कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारीता शिबीर पंचायत समिती कंधार येथे दि.२७ जुन रोजी संपन्न झाले.या शिबीरात ४९ दिव्यांगाना स्वंय चलीत तिन चाकी गाडीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती लक्ष्मीबाई वडजे,
उदघाटक आमदार श्यामसुंदर शिंदे,
आमदार डॉ.तुषार राठोड,तहसिलदार ,व्यंकटेश मुंडे,गटविकास अधिकारी कैलास बळवंत,पंचायत समिती सदस्य शिवाभाऊ नरंगले,उत्तम चव्हाण, सत्यनारायण मानसपुरे ,पंडीत आंबुलगेकर, मन्नान चौधरी,बबर मंहमद,भगवान राठोड,बाळु गोमारे,गंगाप्रसाद यन्नावार,मधुकर डांगे, उपसभापती प्रतिनिधी पंजाबराव वडजे आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.
49 दिव्यांग लाभार्थी दिव्यांगाना साहित्य वाटप केले.अंध्य ,अस्थी,कर्णबधीरआदीसह दिव्यांगाना साहित्य वाटप असल्याचे प्रास्तविक गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी केले.
उपसभापती प्रतिनिधी पंजाबराव वडजे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या.उत्तम चव्हाण पंचायत समिती सदस्य कंधार पंचायत समिती ईमारत जिर्न झाली असून इमारत बांधण्यासाठी शिफारस करावी अशी मागणी आमदार डॉ .तुषार राठोड आमदार श्यामसुंदर शिंदे यांना केली आहे व बांधलेली इमारत अद्याप हस्तांतरीत झाली नाही ती करावी अशी मागणी केली.तर पंडीत आंबुलगेकर यांनी आपले मनोगत मधून इमारतीला कंपाउड भिंत बांधून देण्यासाठी आमदार निधीतून देण्याची मागणी केली.
एकच ग्रामसेवक ११६ गावापैकी केवळ ४ ग्रामसेवकाची उपस्थिती होती .दिव्यांग मित्र अँप चालु करावा व मोठ्या प्रमाणात कंधार तालुक्यात दिव्यांगाची मोठ्या प्रमाणात नोंद करावी अशी मागणी यावेळी शेख दस्तगीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.दिव्यांग कोणत्याही क्षेत्रात कमी नाही दिव्यांची हेळसांड करु नये असे आवाहन दस्तगीर यांनी केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मन्मथ थोटे यांनी केले.