लोहा ; प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंती पाटील व मा.धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला लोहा येथे आले असता मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या सदर्भांत प्रदिपभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळासह निवेदन देण्यात आले.
त्यामध्ये त्यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ चालू करून तात्काळ 500 कोटी मंजूर तरतूद करण्यात यावी बार्टी धर्तीवर मातंग समाजासाठी आर्टी ची स्थापन करण्यात यावी,क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे पुणे येथे आंतरराष्ट्रीय भव्य स्मारक उभारण्यात यावे,अनुसूचित जातीच्या आरक्षणाची वर्गवारी अ,ब,क,ड, नुसार आरक्षण देण्यात यावे,लहुजी साळवे आभ्यास आयोगाची तात्काळ अमंलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या.