ज्येष्ठपौर्णिमेनिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाची काव्यपौर्णिमा रंगली!

नांदेड – ज्येष्ठ पौर्णिमा व महात्मा कबीर जयंतीचे औचित्य साधून शहरातील देगावचाळ येथे काव्य पौर्णिमा, व्याख्यान, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम व खीरदान आदी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जेष्ठ कवी विठ्ठल काका जोंधळे, सेवा निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे, साहित्यिक अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, कवी थोरात बंधू,कवी निवृत्ती लोणे, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, राहूल कोकरे, भैय्यासाहेब गोडबोले, सुभाष लोखंडे, संदीप जोंधळे, किरण कोकरे, रंगनाथ कांबळे, लखन नरवाडे, सुरेश सावळे, नितीन हाटकर, विकी सावळे यांची उपस्थिती होती. 


              येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ नांदेड येथे जेष्ठ पौर्णिमेचे निमित्त ४२ व्या काव्य पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. यात विठ्ठल काका जोंधळे, अनुरत्न वाघमारे, बाबुराव थोरात, निवृत्ती लोणे, गंगाधर ढवळे, भैय्यासाहेब गोडबोले यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच महात्मा कबीर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुष्प, दीप व धूपपूजन करुन अभिवादन करण्यात आले. सामुदायिक त्रीसरण पंचशील, त्रिरत्न वंदना, भीमस्तुती गाथा पठणानंतर काव्यपौर्णिमेस प्रारंभ झाला. दुसऱ्या सत्रात बौद्ध वाङमयाचे अभ्यासक राहूल कोकरे यांनी बौद्ध जीवनातील पौर्णिमेचे महत्व या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. 


        तिसऱ्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष इंजिनिअर सम्राट हाटकर यांनी चमत्कार आणि जादू असे काहीच नसते याबाबत काही प्रात्यक्षिके दाखवुन सर्वांना खिळवून ठेवत मनोरंजनातून विज्ञान सांगितले व उपस्थितांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभाबाई गोडबोले, रेखाताई हिंगोले, चौतराबाई चिंतोरे, शिल्पा लोखंडे, धम्माबाई नरवाडे सौ स्वाती कोकरे सुमनबाई लोखंडे जिजाबाई खाडे गयाबाई नरवाडे, भारतबाई पंडित या होत्या. परिसरातील महिला मंडळ नागरिक बालक बालिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *