सोमवारपासून काय आहेत प्रतिबंधात्मयक निर्बंध ; डेल्टा + ची दहशत

नांदेड ; नांदेड जिल् आपत्ती व्य्वस्थावपन प्राधिकरण समितीचे सदस्या यांच्यासमवेत नांदेड जिल्ह्या तील कोविड रूग्णां्ची स्थिती लक्षात घेवून सोमवार २८ जून २०२१ पासून सुरू करावयाच्या विविध सेवा, आस्थाोपना व त्यांाच्या् वेळा निश्चित करण्या्बाबत निर्णय घेण्यापत आला आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

राज्यादत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या् डेल्टाि प्लरस विषाणुने बाधीत रूग्णु आढळून येत आहेत. या विषाणुचा संक्रमणाचा दर जास्तो असल्याेमुळे विषाणुमधील बदल आणि त्याधपासून होणारा प्रादुर्भाव व फैलाव रोखण्याणच्यादृष्टीरने राज्यासतील सर्वच जिल्ह्या मध्येय स्तनर-3 मधील तरतूदीनुसार सुरू करावयाच्याव आस्था्पना बाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना निर्देशीत केल्या आहेत.

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील तरतूदीनुसार संदर्भात नमूद अधिसूचना 14 मार्च 2020 अन्व‍ये प्रादुर्भाव रोखण्यायसाठी ज्यान उपाय योजना करणे आवश्यिक आहेत त्या करण्या0साठी सक्षम प्राधिकारी म्ह्णून घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नूसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यात सोमवार 28 जून 2021 रोजी पासून शासनाकडील पुढील आदेशापर्यंत पुढील प्रमाणे आदेश निर्गमीत केले आहेत.

सेवेचा तपशिल व निश्चित करण्यात आलेली वेळ पुढीलप्रमाणे आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधीत सर्व दुकाने, आस्थापना यांच्या वेळा- दुपारी 4 वाजेपर्यंत. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा- सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत (शनिवार व रविवार वगळून). मॉल्स, सिनेमा हॉल (मल्टी प्लेक्स व सिंगल स्क्रिन सह), नाटयगृह – पुर्णपणे बंद राहतील. रेस्टॉरंटस- सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत तर सायं. 4 नंतर पार्सल सेवा सुरु राहील. शनिवार व रविवार फक्त पार्सल व होम डिलेवरी सुविधा चालू राहतील. लोकल ट्रेन्स – लागू नाही. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / फिरणे / सायकलींग- दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत. खाजगी आस्थापना / कार्यालये- दुपारी 4 वाजेपर्यंत (सुट दिलेले कार्यालय / आस्थाटपना वगळून). कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालये सहीत (सुट असलेली खाजगी कार्यालये)- 50 टक्के उपस्थितीसह सुरु राहतील. खेळ / क्रीडाप्रकार- सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत. फक्तट मैदानी क्रिडा प्रकारासाठी. चित्रीकरण- चित्रीकरणासाठी निश्चित केलेल्याि बंदिस्तळ ठिकाणी व अशा ठिकाणी इतरांना प्रवेशासाठी मज्जाकव असेल. सायं. 5 वाजेपर्यंत. सायं. 5 नंतर चित्रीकरणासाठी निश्चित केलेल्या बंदिस्तक ठिकाणा व्य.तिरिक्त. बाहेर फिरण्यायस / चि‍त्रीकरणास मज्जातव असेल (शनिवार, रविवार बंद). जमाव – सामाजिक, सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम- सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत. लग्नसमारंभ- 50 व्य क्तींकची मर्यादा. अंत्ययात्रा / अंत्यतविधी- 20 व्य्क्तींठची मर्यादा. बैठका / निवडणूक – स्थानिक स्वराज्य संस्था / सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50 टक्के क्षमतेसह. बांधकाम- फक्तं बांधकामाच्या ठिकाणी मजूरांची राहण्यामची व्यंवस्थाम असणारी बांधकामे चालू ठेवण्यावस मुभा असेल, मात्र तशी व्यैवस्था् नसेल तर दु. 4 वाजेनंतर मजूरांनी बांधकामाचे ठिकाण सोडणे बंधनकारक असेल. कृषि व कृषि पुरक सेवा- संपूर्ण आठवडाभर दुपारी 4 वाजेपर्यंत. ई कॉमर्स – वस्तू व सेवा
नियमीत. जमावबंदी / संचारबंदी- जमावबंदी दुपारी 5 पर्यंत व तद्नंतर संचारबंदी राहील. व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स- 50 टक्के क्षमतेसह पूर्वसूचना देऊन वेळ निश्चित केलेल्याासाठीच दुपारी 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्याेस मुभा असेल परंतू एसी / वातानुकुलिन यंत्रणा चालू ठेवण्याास मुभा असणार नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बसेस)- पुर्ण आसन क्षमतेने परंतू उभे राहून प्रवास करता येणार नाही. माल वाहतूक (जास्तीत जास्त तीन व्यक्ती, चालक/ मदतनीस/स्वच्छक किंवा इतर) प्रवाशांना लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमीत सुरु राहतील. खाजगी वाहने/ टॅक्सी/ बसेस/ लांब पल्ल्याच्या रेल्वे द्वारे प्रवाशांचा अंतर जिल्हा प्रवास नियमीत सुरु राहतील परंतू स्तुर पाचमध्येप जाण्या साठी किंवा स्तयर पाचमध्यें थांबा घेऊन पुढे जाणा-या प्रवाश्यां ना ई-पास आवश्यणक राहील.उत्पादक घटक (निर्माणक्षेत्र) – निर्यात जबाबदा-या पूर्ण करण्याची आवश्यकता असलेली उद्योगक्षेत्र , लघु व मध्यम उद्योगासह युनिट्स नियमीत प्रमाणे चालू राहतील. निर्माणक्षेत्र – अ] अत्यावश्यक वस्तू निर्माण करणारे उद्योग ब ] सातत्याने व निरंतर चालु असणारी उद्योगक्षेत्र क] राष्ट्रीय सुरक्षे करिता आवश्यक संसाधनांची निर्मिती करणारे उद्योग ड] डाटा सेंटर, क्लाउड सर्विसेस, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र इ. नियमीत चालू राहतील. इतर सर्व निर्माण क्षेत्र जे अत्यावश्यक तसेच निरंतर उद्योग या सदराखाली समाविष्ट नाहीत ते सर्व एकूण कामगाराच्याे 50 टक्के क्षमतेने चालू राहतील. कामगारांची Transport bubble द्वारेच ने-आण करण्यातची जबाबदारी संबंधित आस्था्पना प्रमुख यांची राहिल, त्याकशिवाय सदर उद्योग / व्य वसाय चालू करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे (Levels of Restrictions for Breaking The Chain) आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. अत्यावश्यक सेवा- रुग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्साेलय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांनाआवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणवितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचादेखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क,वैद्यकीय उपकरणे, त्यांनासहाय्यभुतकच्चा माल उद्योग आणि अनुषंगिकसेवा यांचे उत्पादन व वितरण यांचा देखील समावेश असेल.

शासकीय व खाजगी पशुवैद्यकीय सेवा, दवाखाने, पशु संगोपन केंद्रव पशु खादयाची दुकाने. सर्व वने व त्यासंबंधीत विभागाच्या अत्यावश्यक बाबी. विमान व त्यापसंबंधी पुरक सेवा (हवाई सेवा, विमानतळे, तत्संषबंधी दुरुस्तीधसेवेच्याय बाबी, कार्गो सेवा.) किराणा समानाची दुकाने, भाजीपाला व फळविक्रीते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई / चॉकलेट/केक/ खाद्य/मटन/चिकन/अंडी/मासे इत्याजदी दुकाने.

शितगृहे आणि साठवणुकीची गोदामसेवा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक बसेस. स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सूनपूर्व उपक्रम व सेवा. स्थानिक प्राधिकरणाव्दारे पुरविणेत येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा. रिर्झव्ह बॅक ऑफ इंडीया आणि त्यांच्या कडून अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केलेल्या सेवा. सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त वित्तीय बाजाराशी निगडीत पायाभूतसंस्था, स्टॉक एक्सेजेंस, डिपॉझिटर्स, क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स इत्यादी आणि सेबीकडे नोंदणीकृत इतर मध्यस्थ. दूरसंचार सेवा सुरू राहणेसाठी आवश्यक अशा दुरूस्ती / देखभाल विषयक बाबी. मालाची / वस्तुंची वाहतूक. पाणीपुरवठा विषयक सेवा. शेती संबंधित सेवा आणि शेतीशी निगडीत सर्वकामामध्ये सातत्य राहावे याबाबत शेतीकामासाठी लागणाऱ्या सर्वअनुषंगिकसेवा, बी-बियाणे, खते, औजारे आणि त्यांची दुरूस्ती सेवा यांचा ही समावेश असेल.

सर्व प्रकारच्या व्यापारी मालाची व उत्पाकदनाची आयात -निर्यात. ई कॉमर्स ( फक्त अत्यावश्यक सेवा आणि माल यांच्या पुरवठांशी निगडीत). मान्यताप्राप्त वृत्तपत्र आणि त्यांच्याशी संबंधित सेवा. पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने विषयक सेवा. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा. डेटासेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा सेवा. शासकीय आणि खाजगी सुरक्षा विषयक सेवा. विद्युत आणि गॅसपुरवठा विषयक सेवा. एटीएम, पोस्टल सेवा. कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक). अत्यावश्यक सेवेसाठी लागणारा कच्चा माल, पँकेजिंग मटेरीयल यांचे उत्पादन करणारे उद्योग. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा. सर्व ऑप्टी.कल्सक शॉप. वाहतूक व्यववस्थे शी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्क शॉप, सर्व्हीास सेंटर व स्पे.अर्स पार्ट विक्री आस्था पना. याव्यतिरिक्त कोणतीही सेवा जी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक व आपात्कालीन सेवा म्हणून घोषित केली आहे.

या निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गटविकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायत मुख्याधिकारी यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी Incident Commander जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची राहिल.
निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील. या आदेशाची अंमलबजावणी दिनांक 28 जून 2021 चे सकाळी 7 वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहिल. परंतू कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क0चा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक करण्यााची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक नांदेड, नांदेड वाघाळा महानगरपालीका आयुक्तब, सर्व नगर परीषद / नगरपंचायत मुख्यारधिकारी यांचे वर राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्का ळ कार्यवाही करण्यामत यावी. आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्यंक्तीर, संस्थाक अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्तीथ व्यावस्थायपन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्याु कृत्याासाठी कोणत्यालही अधिकारी / कर्मचारी यांचे विरुध्दा कार्यवाही केली जाणार नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट व ऑक्सिजन बेड्स व्यापन्या च्या् टक्केवारीमध्येव वाढ झाल्या स नव्याोने प्रतिबंधात्मिक आदेश निर्गमीत करण्याात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले.

डेल्टा + म्हणजे तिसरी लाट? http://yugsakshilive.in/?p=12529 युगसाक्षी संपादकीय

डेल्टा + म्हणजे तिसरी लाट? http://yugsakshilive.in/?p=12529 युगसाक्षी संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *