नांदेड जिल्हा जात पडताळणी कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी.

नांदेड ; प्रतिनिधी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. बहुजन समाजाला राजकिय निर्णय प्रक्रियेत समावून घेण्यासाठी त्यांनी १९१६ साली निप्पाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ही संस्था स्थापन केली. १९१७ साली. पुनर्विवाहाचा कायदा करुन विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अस्पृष्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स १९१९ साली. सवर्ण व अस्पृष्याच्या वेगळ्या शाळा असण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दुर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.

अशा प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी समाजात महत्वाचे बदल घडवून आणले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या कार्याला मानाचा मुजरा, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमीत्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे शनिवारी दिनांक २६ जून २०२१ रोजी. मा. श्री. आ. ब. कुंभारगावे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली..!

याप्रसंगी,
*मा. श्री. आ. ब. कुंभारगावे, व्ही. बी.आडे, ए.एम. झंपलवाड, संजय पाटील, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, शंकर होनवडजकर, सुनील पतंगे, अनिकेत वाघमारे, जोगिंदर बुकतरे यांची उपस्थिती होती..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *