नांदेड/प्रतिनिधी-ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकविण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ नांदेड महानगर भाजपाच्यावतीने सिडको येथील चंदासिंगकॉर्नर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. हे आंदोलन भाजपाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. नांदेड महानगर भाजपाच्यावतीने सिडको परिसरात सकाळी 10 वाजता आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. भाजपाच्या चक्काजाम आंदोलनामुळे नांदेड-हैद्राबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती.या आंदोलनात भाजपाचे हजार-बाराशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपाच्या या रास्तारोको आंदोलनामुळे कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नांदेड लोकसभेचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आंदोलनातील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन कांही काळ रास्तारोको आंदोलनात आपला सहभाग नोंदविला आहे. यावेळी खा.चिखलीकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर सडकून टीकास्त्र सोडले. त्यानंतर खासदार पुढील आंदोलनासाठी रवाना झाल्यानंतर भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु ठेवण्यात आले होते. दुपारी 12 वाजता पोलिसांनी आंदोलनकर्ते प्रविण साले यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांना अटक करुन नंतर त्यांची सुटका केली. भाजपाच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांची लांब रांग लागली होती हे विशेष!
आंदोलनस्थळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, महानगराध्यक्ष प्रविण साले, ओबीसी सेलचे महानगराध्यक्ष व्यंकटेश जिंदम, वैजनाथ देशमुख, व्यंकट मोकले आदिंची भाषणे झाली.प्रास्ताविक धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकूर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महानगरचे प्रसिध्दीप्रमुख धीरज स्वामी यांनी केले.
भाजपाच्या या चक्काजाम आंदोलनात प्रदेश भाजपाचे कार्यकारिणी सदस्य डॉ.संतुकराव हंबर्डे, चैतन्य देशमुख, दिलीप कंदकुर्ते, मिलींद देशमुख,भाजपा जिल्हा प्रवक्ता प्रल्हाद उमाटे, संध्या राठोड यांच्यासह शहर भाजपाचे पदाधिकारी शीतल भालके, बालाजी पुणे गांवकर, भाजपाओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम, सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पाटील धनेगांवकर, दिलीप भाऊ ठाकूर, उपाध्यक्ष आनिलसिंग हजारी, बागड्या यादव, शितल खांडील, सुशील चव्हाण,नवल पोकर्णा, परमवीरसिंग मनोत्रा, संजय सुकळीकर, धीरज स्वामी, संजय घोगरे, श्रीराज चक्रवार, शैलेंद्र ठाकूर, विश्वंभर शिंदे, महादेवी मठपती, वैशाली देबडवार, रत्नप्रभा गोपीवाढ, अर्चना बर्कले, विपूल मोळके, शततारका पांढरे, अश्विनी महाले, श्रद्धाताई चव्हाण, अविनाश नाईक, चंचलसिंग जाट, बालाजी गिरगावकर, अकबरखान पठाण, शंकर मनमाडकर, अनिल गाजुला, शंकर पानेगावकर, अमोल कुलथे, संतोष कांडेकर, नरेंद्रभाई सचिन, वैद्यकीय आघाडीचे शहराध्यक्ष डॉ. सचिन पाटील उमरेकर, शैलेश कराळे, रमेश गटलेवार, अरविंद भारतीया, वैजनाथ देशमुख, सूर्यकांत कदम, संदीप कराळे, नील मोरे, बजरंग ठाकुर, हरभजनसिंग पुजारी, केदार नांदेडकर, कीर्ती छेडा, मनोज यादव, अभिषेक चौबे, लक्ष्मीबाई वाघमारे, यादव अमिल्कांठवर, बाळू लोंढे, राजू यादव, सोनू, उपाध्याय व्यंकटेश साठ,े अपर्णा चितळे, अशितोष धर्माधिकारी, एकनाथ धमने, देवानंद जाजू, राजू गोरे, बालाजी अलमखाने, महादेव तिरवडे, रामराव पास्ते, माधव पांचाळ, भानुदास लोळगे, निखिलेश देशमुख, सुनील पाटील, बबलू यादव, आनंद बामनवाडा, रुपेश व्यास, माधव वाघमारे ,संदीप छप्परवाल, आशुतोष कपाटे, किरण मोरे, गणेश मोरे, गौरव कुंटूरकर, गजानन करते, उमेश स्वामी ,सागर जोशी, बाबुराव लाड, प्रतापसिंह खालसा, साहेबराव गायकवाड, वैभव खांडेकर, दिगंबर लाभसेटवार, सुरेश नरवडे, विनय सगर, कृष्णा टोकलवाड, संतोष क्षिरसागर, कचरू बंडेवार, गजानन करपे, उमेश स्वामी, मधुकर मानेकर, बंडू कटवड, गणेश नरवाडे, गणेश बत्तलवार, गौरव कुंटूरकर, राम वड, गणेश मोरे, अनिल लालवाणी यांच्यासह जवळपास हजार ते बाराशे भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.