नांदेड – आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराज यांची १४७ वी जयंती प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ नांदेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वजिराबाद पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार व पी.एस.आय. जी.बी.जाधव होते.
तर प्रमुख उपस्थिती सेवानिवृत्त उपायुक्त महानगरपालीका प्रकाश येवले, राहुल कोकरे तुपेकर, रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष दीपक सातोरे, साहित्यिक गंगाधर ढवळे, साहित्यिक पांडुरंग कोकुलवार, सौ.अनिताताई संजय नरवाडे, ऍड.आकाश खाडे, सिध्दार्थ कसबे, सुभाष लोखंडे होते. यावेळी राष्ट्रपाल खाडे सैनिक (भारतीय सैन्य दल) यांच्या वतीने एकूण २०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ‘एक वही व एक पेन’चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पुरुष ज्येष्ठ नागरिक, जळबा थोरात, गौतम येवले, रंगनाथ कांबळे व महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ निर्मलाबाई पंडित, सौ शिल्पा लोखंडे, श्रीमती भारतबाई पंडित उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.