कंधार ;प्रतिनिधी
तहसील कार्यालय कंधार येथे मुखेड मतदारसंघाचे माननीय आमदार तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते मौजे नागलगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी संजय नागनाथ कस्तुरे यांच्या पत्नी संगीता संजय कस्तुरे यांना एक लक्ष रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटपाचा धनादेश देण्यात आला .
कंधार तालुक्यातील मौजे नागलगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी संजय नागनाथ कस्तुरे यांनी आत्महत्या करुन जिवनयात्रा संपवली होती.शासनाकडून तहसिलदार व्यंकटेश मुंडे पुढाकारातूनयांच्या मयताची पत्नी संगीता संजय कस्तुरे यांना एक लक्ष रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटपाचा धनादेश आज दि.२७ जुन रोजी देण्यात आला .यावेळी मधुकर डांगे यांची उपस्थिती होती.