आज दिनांक २७.६.२०२१ रोजी कृषी संजीवनी मोहीमअंतर्गत तंत्रज्ञान सप्ताह मौजे पेठवडज ता.कंधार येथे मा.आ.डॉ.तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे देविकांत देशमुख, कंधारचे तहसीलदार व्यंकटेश मुंढे, तालुका कृषी अधिकारी कंधार रमेश देशमुख, मंडळ कृषी अधिकारी पेठवडज विकास नारळीकर,प्रभारी कृषी पर्यवेक्षक संजय माळी,विजय कळणे ,कृषी सहाय्यक सागर जवादे,सुनील देशमुख, नामदेव कुंभारे,सतीश वाघमारे,स.सरताज,संजय माळी , आत्माचे विनोद पुलकुंडवार,समुह सहाय्यक देवकांबळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचलन संभाजी वडजे तर प्रास्ताविक विकास नारनाळीकर यांनी केले.
यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांनी आपले विचार मांडले कृषी विभागाच्या या उपक्रमाबद्दल व विविध विषयांवर तांत्रिक माहिती व मार्गदर्शन मिळत असल्याबाबत कृषी विभागास धन्यवाद दिले.पावसाचा खंड पडला आहे त्याबाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
तालुका कृषि अधिकारी कंधार रमेश देशमुख यांचे मार्गदर्शन
तालुका कृषि अधिकारी कंधार रमेश देशमुख यांनी कृषी संजीवनी योजने अंतर्गत तालुक्यात विविध विषयांवर तांत्रिक माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात येत असल्याचे सांगितले. सोयाबीन बियाणे उगवणशक्ती,रूंद वरंबा सरी पद्धतीने लागवड,बिज प्रक्रिया, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर व खतांची बचत,एक गाव एक वाण, पिकावरील किड रोग व्यवस्थापन, गुलाबी बोंडअळी यासह कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.तालुक्यातील प्रमुख पिक कापूस याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकाद्वारे उगवणशक्ती,बिजप्रक्रिया, मशीनद्वारे टोकन पेरणी इत्यादी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली याबाबत या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक
कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे डॉ.देविकांत देशमुख यांनी प्रमुख पिकाचे उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान याबाबत सविस्तर माहिती दिली.भाजीपाला उत्पादन याबाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.हळद लागवड व संगोपन याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.
आ.डॉ.तुषार राठोड यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी मोहीमेला शुभेच्छा दिल्या
अध्यक्षीय भाषणात मा.आ.डॉ.तुषार राठोड यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी मोहीमेला शुभेच्छा दिल्या व कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.शेतकर्यांना विविध विषयांवर तांत्रिक माहिती देऊन उत्पादन खर्च कमी करत उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांचे जिवनमान सुधारावे असे सांगितले.गावोगाव शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.तालुक्यात शेती व्यवसाय अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. हा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सुखसमृद्धीचा जावो अश्या शुभेच्छा दिल्या.
नारायण गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.कृषी विभागाने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
दत्ता गायकवाड ,आनंदा लोहबंदे, एकनाथ डाकोरे ,साईनाथ पुटवाड, धोंडीराम गंडमवाड,श्याम जोशी, परमेश्वर बकवाड गिरधारी केंद्रे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.