नागलगाव येथील प्रयोगशिल शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मुन्ना खाडे यांचा कृषि विभागाकडुन सन्मान

कंधार :- हनमंत मुसळे

तालुक्यातील मौ. नागलगाव येथील प्रयोगशिल शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते मुन्ना गंगाधर खाडे यांचा राज्यस्तरीय पिक स्पर्धेत तालुका स्तर व्दितीय क्रमांक मिळाल्याबदल कृषि विभागा तर्फे सन्मान करण्यात आला आहे.
दि. 1 जुलै 2021 रोजी कृषि दिनाचे औचित्य साधुन पंचायत समिती कार्यालय, कंधार येथे प्रयोगशिल शेतकरी मुन्ना खाडे यांचा मा. व्यंकटेश मुंडे (तहसिलदार), मा. देशमुख (ता. कृषि अधिकारी), अँड. विजय धोंडगे, सौ. घोरबांड (सभापती), आदि मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उत्कृष्ट रब्बी पिक हरबराचे उत्पादन केल्याबदल देण्यात आला आहे.

या पुरस्काराबदल धुळगंडे (मंडळ कृषि अधिकारी), विजय चामले (कृषि सहाय्यक), सत्यनारायण मानससपुरे (पं.स. सदस्य ), उत्तम चव्हाण (पं.स.सदस्य ), शिवराम मुंडे (कृषि अधिकारी), डाँ. दिनकर जायभाये, गणेश कुंटेवार, बि. एस. मुंडे, बालाजी चुकलवाड (माजी सैनिक ), एस. पि. केंद्रे , अशोक गुट्टे, शरद मुंडे, पप्पु मुसळे, मोरेश्वर चाटे, अरुण कागणे, माधव मुंडे आदिनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *