नांदेड ;प्रतिनिधी
भाजपा महानगर नांदेड व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलच्या वतीने कृपाछत्र या उपक्रमांतर्गत गुरुवारी मलनिस्सारण विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर व उप अभियंता अनिल कुलकर्णी यांच्या हस्ते छत्र्या वितरित करण्यात आल्या.
घामोडिया फॅक्टरीमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून लॉयन्स क्लबचे सचिव अरुणकुमार काबरा,भाजपा व्यापारी मोर्चाचे उपाध्यक्ष रुपेश व्यास,सुरेश शर्मा आणि संतोष भारती हे उपस्थित होते. या पावसाळ्यात २०२१ गरजूंना छत्री वाटपाचा छत्र्या वितरणाचा संकल्प दिलीप ठाकूर यांनी घेतला असून आत्तापर्यंत ७६६
छत्र्या वितरीत करण्यात आले आहे. शंभर टक्के लोकसहभागातून घेण्यात येत असलेल्या या उपक्रमांमध्ये एका दानशूर नागरिकाने आपले नाव न छापण्याच्या अटीवर १०८ छत्र्या दिलेल्या आहेत.कै. रेणूकाबाई बच्चेवार यांच्या स्मरणार्थ प्रा.डॉ. दिपक बच्चेवार तसेच शिवराज पाटील माळेगावकर, माळेगाव मक्ता ता.देगलुर यांनी प्रत्येकी १०० छत्र्या दिलेल्या आहेत.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी ६२ छत्र्या दिलेल्या आहेत.प्रत्येकी ५१ छत्री देणाऱ्यांमध्ये अनूपकुमार राजेन्द्रकुमार कासलीवाल धर्माबाद,
लॉयन्स नांदेड सेंट्रल सचिव लॉ. अरुणकुमार काबरा,अ.भा. क्षत्रीय महासभा महाराष्ट्र प्रदेश महिलाध्यक्षा सौ.सुषमा नरसिंह ठाकूर यांचा समावेश आहे. स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांनी ४० छत्र्या दिल्या आहेत.
कै.केरबा माधवराव गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार यांच्यातर्फे,श्रीमती इंदिरा राजाराम वेसणेकर,कै.चंद्रभागा केरबा गंजेवार यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत गंजेवार यांच्यातर्फे प्रत्येकी २५ छत्र्या वितरित करण्यात आल्या. प्रत्येकी २० छत्री देणाऱ्यांमध्ये कै.सौ.सुशिलाबाई द्वारकादास साबू यांच्या स्मरणार्थ गोविंद द्वारकादास साबू,मोहित जयप्रकाश सोनी,सानवी पांडुरंग दांडेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त,सिद्राम सूर्यभान दाडगे चैतन्यनगर तरोडा,
सौ.मयुरी गोपालजी दरक अमेरिका यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. उमा गट्टानी यांच्यातर्फे,विश्वजीत मारुती कदम धानोरा,दीपक झरकर लाईजाईनगरी नांदेड यांचा समावेश आहे.एका छत्रीवर दोन्ही बाजूनी नाव प्रिंट करण्यासह सव्वाशे रूपये शुल्क आकारण्यात येत असून संकल्पपूर्ती होण्यासाठी १२५५ छत्र्यांची आवश्यकता असल्यामुळे दानशूर नागरिकांनी किमान २० छत्र्या देऊन सहकार्य करावे असे आवाहन भाजपा महानगर नांदेड व लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.