नांदेड :- राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे माहूर येथे आले असतांना त्यांनी अत्यंत साधेपणाने व कोविड-19 नियमांचे पालन करत माहूर शक्तीपीठ असलेल्या श्री रेणुका देवी मंदिराच्या पायरीचे दर्शन घेतले. नागरिकांनी कोविड-19 नियमांचे पालन करण्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी त्यांच्या सोबत तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर, माजी आमदार प्रदीप नाईक उपस्थित होते. यावेळी भाव तिथे देव, ही संतांची वाणी असल्याचे त्यांनी सांगीतले.
श्री रेणुकादेवी मंदिराचे पायरीवर माहूर तहसिलदार तथा संस्थानचे पदसिद्ध कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर यांनी मंत्री जयंत पाटील यांना शाल श्रीफळ प्रसाद देऊन यथोचित स्वागत केले. यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी श्री दत्तशिखर संस्थान येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी दत्त शिखर संस्थानचे अध्यक्ष परमपुज्य श्री महंत महाराज यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचेसोबत सचिव श्री पाटील उपस्थित होते.