माजी आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे यांना 2021चा ” महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार ” जाहीर

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात नंबर एक वर असलेली व नावारूपाला आलेली शैक्षणिक संस्था म्हणजे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार ही संस्था होय आणि या संस्थेचे सचिव माजी सभापती , माजी आमदार , ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांना इसवी सन 2021 चा *महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार* जाहीर झाला असून हा पुरस्कार महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने 2021 साठी जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार मा. माजी आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे यांनी सामाजिक , शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे .
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे सचिव तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत कार्य करत असताना त्यांनी सामाजिक क्रांती घडवण्यासाठी विविधांगी कार्य केले असून त्यांना दिन दलितांचे कैवारी व गोरगरीबांचे दाता म्हणून सुद्धा ओळखले जातात.

मा. गुरुनाथराव कुरुडे यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवली परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा कंधार व नांदेड चे नाव संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या मध्ये नेऊन पोहोचवले वाडीत तांड्यावर शिक्षणाची गंगा वाहण्यास सुरुवात केली तसेच तळागाळातील शोषित पिडीत लोकांच्या लेकरांना शिक्षण मिळावे व शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक उत्क्रांती व्हावी या उद्देशाने समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत विविधांगी कार्याच्या माध्यमातून ते पोहोचले म्हणूनच त्यांच्या या सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव 2021 पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराच्या निवडीचे पत्र महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक डॉक्टर मुकुंदराव पाटील , सौ.आर्चनाताई ( सदस्य ) , सौ.आश्वीनीताई कांबळे ( सदस्य ) , इत्यादी मान्यवरानी सुलोचना निवास बहादरपुरा या ठिकाणी जाऊन पुरस्कार निवडीचे प्रमाणपत्र देऊन पुढील कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. या त्यांच्या निवडीबद्दल साहेबांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

याप्रसंगी प्रा .वैजनाथराव कुरुडे ( शा.स.स.नांदेड ) , उल्हास मेमोरियल ट्रस्ट संचलित सद्गुरु आश्रम शाळा बहादरपु-याचे मुख्याध्यापक तथा सर्व स्टाप , कै राजाराम देशमुख माध्यमिक विद्यालय टेळकी ता. लोहा चे मुख्याध्यापक तथा सर्व स्टाफ तसेच माणिक आदर्श विद्यालय हाडोळी येथील मुख्याध्यापक व सर्व स्टाफ तसेच पोलीस कॉन्स्टेबल ढगे साहेब , अँड. दिलीप कुरुडे , तसेच पत्रकार हाफिज घडीवाले साहेब , प्रदीप इंदुरकर सर , जाधव मामा , व मोठ्या प्रमाणात नातेवाईक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेशजी गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *