नांदेड ; प्रतिनिधी
खरीप हंगाम यंदाच्या वर्षीच्या 2021 च्या खरीपाच्या पेरणी साठी कृषी विभागाने सोयाबीन चे बियाणे शेतकर्यांना वाटप करण्याचे ठरवले.त्या योजनेच्या अमलबजावणी चा भाग म्हणून गरजु शेतकर्यांना बियाणे मागणी साठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या सूचना/जाहीरात नायगांव(खै) तालुक्याच्या तालुका कृषी अधिकार्याने केली.
तालुक्यातील अनेक गरजु, गरीब शेतकर्यांनी कोरोना चे संकट व लॉकडावुन कडक असताना जिवाची पर्वा न करता सोयाबीन बियाने मागनी साठी ऑनलाइन नोंदणी केली.पण प्रत्यक्ष बियाणे वाटपाच्या वेळेस असंख्य नोंदणी केलेल्या शेतकर्यांना बियाणे मिळालेले नाही.
पण अनेक नोंदणी न केलेल्यांना बियाणे मिळाले.
कांही शेतकर्यांना सोयाबीन बियाण्याची 30 किलोची बॅग 2040 रुपयास तर कांही मोजक्या शेतकर्यांना 200/300 रुपयास देण्यात आली.ज्यांना ऑनलाइन नोंदणी करून ही बियाणे बॅग मिळाली नाही, त्या पैकी कांही नी नायगांव (खै)तालुका कृषी आधिकार्यांकडे तक्रार केली त्यांना आता मोफत बियाणे घेवुन जा, असे तालुका कृषी अधिकारी सांगत आहेत.
वरिल सर्व बाबी शासकीय कार्यालय/अधिकारी/नियम कशासी ही सुसंगत वाटत नाहीत.सोयाबीन बियाण्याच्या वाटपात मोठा भ्रष्टाचार/घोटाळा तालुका कृषी अधिकार्याने किंवा त्यांच्या सहमतीने झालेला आहे अशी रास्त शंका आहे.
कारण, तालुका अधिकार्याने लाभार्थी निवडताना काय निकष लावले, किंमती कमी जास्त लावण्याचे व कांही लोकांना मोफत बियाणे ऑफर करण्याचे नेमके निकष कोणते?
आता पेरणी चा हंगाम जवळ जवळ संपत आलेला असताना बियाणे मोफत देण्यासाठी ते तयार आहेत.
अनेक शेतकरी बियाणे मिळण्या पासुन वंचित असताना, बियाणे शिल्लक राहिले च कसे?
यात नक्की काळाबाजार झालेला आहे.
तरी वरिल प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी आधिकार्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी या साठी सामाजिक कार्यकर्ते अविनाश अनेराये यांनी मुख्यमंत्री व जिल्हाचे जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे निवेदन दिले.