हरित कंधार परिवाराच्या वतीने मोफत फळझाड वाटप ; कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिना पासुन तिन दिवसात पाच हजार फळझाड वाटपाचे नियोजन – शिवा मामडे यांची माहीती

कंधार ; प्रतिनिधी

हरित कंधार परिवाराच्या वतीने मोफत फळझाड वाटपाची सुरुवात कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती दिना पासुन झाली असून तिन दिवसात पाच हजार फळझाड वाटपाचे उदीष्ये असल्याची माहीती संयोजक शिवा मामडे यांनी दिली.

१ जुलै २०२१ रोजी शिवराम पवार मंगल कार्यालय कंधारच्या प्रांगणात हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य साधून हरित कंधार परिवाराच्या वतीने फळझाड वाटप या कार्यक्रमाचे अध्यक्षा, कंधार शहराच्या प्रथम नागरिक न.पा. कंधारच्या अध्यक्षा सौ. शोभाताई अरविंदराव नळगे उदघाटक आमदार सौभाग्यवती आशाताई शिंदे , जि.प.सदस्या सो. संध्याताई धोंडगे, तहसीलदार मुंडे साहेब,माजी जि.प.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे,पं.स. उत्तम चव्हाण हरित कंधारचे प्रमुख शिवाभाऊ मामडे यांनी प्रास्तविक केले. उत्तम चव्हाण, सौ.संध्याताई धोंडगे, युवा नेतृत्व डाॅ.प्रा.पुरुषोत्तम धोंडगे,तहसीलदार मुंडे, सौ.आशाताई शिंदे यांनी आपले मौलिक विचार मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *