कंधार ; प्रतिनिधी
कंधार येथील बहादरपुरा जिल्हा परिषद शाळेत लोकनेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांनी शिक्षिका सौ.जोंधळे मॅडम,केंद्रे सर,आणि सिंधी येथे 15 वर्ष शिक्षक पेशा बजावणारे धोंडीबा गुंटुरे यांच्या निरोप समारंभाला उपस्थित राहून सेवानिवृत्ती बद्दल सत्कार केला.
यावेळी अध्यक्षस्थानी संजयजी येरेमे (गटशिक्षाधिकारी कंधार) हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पूयेड, व्यवहारे साहेब,पांडे , उमाळे मधुरराव, तुमवाड सर,कोठारे सर, पांडागळे सर आदिजन उपस्थित होते..
यावेळी लोकनेते कवळे गुरुजी यांनी गुंटूरे यांच्या केलेल्या कार्याचे खूप कौतुक केले,ते म्हणाले चांगले शिक्षक मिळणे आणि गावाचा विकास होणे याला खूप मोठे भाग्य लागते,आम्ही सिंधीकर भाग्यवान आहोत म्हणून आम्हाला गुंटूरे सर सारखा शिक्षक मिळाला अशा प्रतिक्रिया देत त्यांनी गुंटूरे सरांचे कौतुक केले.
तसेच ते बोलतांना म्हणाले मी ही एक शिक्षक आहे.
.शिक्षक समाजात चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात त्याच अनुषंगाने शिक्षकांची एक महत्वाची भूमिका असते.
विद्यार्थ्यांच्या वडिलांना पालक म्हणून व्यवसाय विषयी माहिती पुरविणे हा ही एक धर्म असतो आपण ते करावा असे ही ते म्हणाले..तसेच तालुक्यातील शेतकरी हे भाग्यवान आहेत त्यांना शेजारी मण्याड नदी वाहते यामुळे शेतकरी समृद्ध होईल.
शेतकरी सुधारला तर गाव सुधारेल आणि गाव सुधारला तर तालुका सुधारेल असेही ते म्हणाले.