कंधार ; प्रतिनिधी
आज पर्यंत कंधार व लोहा-कंधार मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार महोदय!
हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात १७ सप्टेंबर १९५० रोजी विजयी झाल्यानंतर १९५२ च्या हैद्राबाद विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत क्राॅग्रेस पक्षाचे गोविंदराव मोरे देसाई टेळकीकर यांनी प्रतिनिधित्व केली.
त्यानंतर १९५७,१९६३,१९६७ आणि १९७२ सलग चार टर्म शेकापचे केशवराव शंकरराव धोंडगे यांनी दुसरे,तिसरे,चौथे आणि पाचवे आमदार म्हणुप्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केले.१९७८ ते १९८० पर्यंत शेकापचे गुरुनाथराव माणिकराव कुरुडे यांनी एक वेळा सहावा आमदार म्हणुन प्रतिनिधित्व केले.१९८० पासून १९८५ पर्यंत क्राॅग्रेस पक्षाचे ईश्वरराव नारायणराव भोसीकर यांना सातवा आमदार म्हणुन एक वेळ प्रतिनिधित्व केले.परत १९८५-१९९० व १९९० ते १९९५ पर्यंत पुन्हा दोन टर्म शेकापचे केशवराव शंकरराव धोंडगे यांना आठवा अन् नववा आमदार म्हणुन निर्विवाद प्रतिनिधित्व केले.त्यानंतर १९९५ ते १९९९ आणि १९९९ ते २००४ पर्यंत सलग दोन टर्म रोहिदास खोब्राजी चव्हाण यांना दहावा आकरा आमदार म्हणुन विधानसभेत प्रतिनिधित्व केले,.२००४ ते २००९ पर्यंत अपक्ष म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बारावा आमदार म्हणुन प्रतिनिधित्व केले.२००९ ते २०१४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकरराव गणेशराव धोंडगे यांना तेरावा आमदार म्हणुन लोहा -कंधार मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.
पुन्हा २०१४ ते २०१९ पर्यंत शिवसेना पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चौदावा आमदार म्हणुन प्रतिनिधित्व केले.गत पाच वर्ष शेकापचे श्यामसुंदर दगडोजी शिंदे यांना पंधरावे लोहा-कंधार विधानसभेचे आमदार म्हणुन प्रतिनिधित्व केले.आणि आज लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)यांनी निर्विवाद यश मिळवत सोळावे आमदार म्हणुन प्रतिनिधित्व करण्यासाठीच मतदार राजांनी विजयी केले.
आज पर्यंत लोहा-कंधार विधानसभा मतदार संघाचे सोडावे आमदार म्हणुन निवडले आहे.
गोपाळसुत-
दत्तात्रय एमेकर गुरुजी,
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार