ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीच्या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार – मनोहर धोंडे

 

88-लोहा विधानसभा मतदार संघातील इव्हीएम मशीनवरील चालू असलेली मतमोजणी प्रक्रिया त्वरीत बंद करून व्हिव्हिपॅड मधील संपुर्ण स्लिपची मतमोजणी केल्याशिवाय निवडणूक
निकाल जाहिर करण्यात येऊ नये कारण मी उच्च न्यायालयात दाद मागणार असले बाबत.

 

संदर्भ:-आज शनिवार दिनांक 23/11/2024 रोजी सकाळी 8:00 ते आतापर्यंत म्हणजे दुपारचे 3:00 पर्यंत ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीच्या एकूण 25 फेऱ्यांपैकी मतमोजणी पुर्ण झालेल्या एकूण 15 फेऱ्या.

महोदय,

वरील संदर्भिय विषयास अनुसरून मी प्रा. मनोहर बाबाराव धोंडे (अपक्ष उमेदवार) सेवा

जनशक्ती पार्टीचा 88-लोहा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार असून आज सकाळी

8:00 वाजल्यापासून ते दुपारी 02:30 पर्यंत मतमोजणी केंद्रावर स्वतः प्रत्यक्ष हजर

होतो म्हणून

मोजणी दरम्यान तृटीबाबत माझी खालील प्रमाणे तक्रार देत आहे. माझ्या तक्रारी नुसार कायदेशीर

पुर्तता करून 88-लोहा विधानसभा मतदार संघातील व्हिव्हिपॅड मशील वरील निघालेल्या स्लिपची पुर्ण मतमोजणी केल्याशिवाय कृपया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूकीचा निकाल
जाहिर करण्यात येऊ नये कारण मी आपणासह निवडणूक आयोगाव विरुद्ध मा. उच्च न्यायालयात

दाद मागणार आहे. असे की, या तक्रारी द्वारे माझी पहिली मागणी आहे की, इव्हिएम मशील द्वारे 88-लोहा विधानसभा मतदार संघात 3,01,688 मतदारांपैकी एकूण 2.26,837 मतदारांनी बुधवार दिनांक
20/11/2024 रोजी मतदान केलेले आहे. त्या दरम्यान इव्हिएम मशीनच्या चिप्समध्ये माझे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकरवर बटन दाबल्यास तांत्रिक दृष्टया राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार श्री प्रताप चिखलीकर यांच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर मतदान स्थलांतर होण्याची मॅनेजमेंट निवडणूक आयोगातील संबंधीत लोकांना हातीशीधरून केल्याचा मला संशय आहे. म्हणूनच कोणताही प्रचार नसलेला व चार नंबरला जाणारा उमेदवार एक नंबरवर आलेला दिसत आहे.

त्यामुळे 88-लोहा विधानसभेच्या इव्हिएम मशीनवर झालेल्या मतदानाच्या मोजणी बरोबर व्हीव्हीपॅड वरील झालेल्या मतदानाच्या स्लिपची मतमोजणी करण्यात यावी आणि दोन्हीही मतमोजणी पुर्ण झाल्याशिवाय कोणताही निर्णय जाहिर करण्यात येऊ नये कारण मी मा. उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

असे की, निवडणूक आयोगातील लोकांना हाताशी धरून इव्हिएम मशीन मधील चिप्समध्ये छेडछाडकरून मतपत्रीकेवरील अनुक्रमांक 12 वर असलेले माझे निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर चे बटन दाबून मतदारांनी मतदान केले असता ते मत प्रेशर कुकरला न जाता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांचे अनुक्रमांक 2 वर असलेल्या घड्याळ चिन्हांवर माझे 80% मतदान स्थलांतर होण्याची मॅनेजमेंट केलेली आहे असे माझे ठाम मत आहे.

एवढेच नाहीतर आज मतमोजणी करतांना एकूण 14 टेबल वरील अनेक इव्हिएम मशीन 99% चार्जिंग असल्याचे दिसून आले जे की दिवसभर मतदान करताना मशीन वापरल्या नंतरही मशीन एवढी चार्ज राहणे शक्य नाही. तसेच अनेक इलेक्ट्रॉनिक मशीनचे शील तुटलेले आढळूण आले. तसेच काही मशीन शील असताना त्या-त्या बुथवरील एजंटची स्वाक्षरी आढळून आलेली नाही. या विरोधात मतमोजणीच्या वेळी तोंडी आक्षेप घेऊन मतमोजणी करू नये अशी विनंती केल्या नंतर ही माझ्या प्रतिनिधीच्या अक्षेपाला न जुमानता 15 व्या फेरी पर्यंत मतमोजणी केलेली आहे. एवढेच नाहीतर मतमोजणीच्या टेबल क्रमांक 8 वरील माझा प्रतिनिधी श्री पवन वाले यांनी अनेकदा तोंडी अक्षेप घेऊन मतमोजणी थांबवण्याची विनंती केली. त्यामध्ये प्रामुख्याने मतदान केंद्र क्रमांक 176-सावळेश्वर, केंद्र क्रमांक 120-आलेगाव, केंद्र क्रमांक 78-भिमलातांडा व केंद्र क्रमांक 50- लोंढेसांगवी इत्यादी केंद्रावरील इव्हिएम मशीनची मतमोजणी करतांना मशीनचे शील तुटलेले असणे, मशीनवर प्रतिनिधीची स्वाक्षरी नसणे व मशीन 99% चार्जिंग असणे या बाबत तोंडी आक्षेप नोंदवून मतमोजणी थांबविण्यास विनंती केलेली असतांनाही त्यास न जुमांनता अधिकाऱ्यांकडून मतमोजणी चालू ठेवलेली आहे. त्यामुळे उमेदवार म्हणून सदरची मतमोजणी थांबवण्यात यावी व व्हिव्हिपॅडवरील स्लिपची पुर्ण मतमोजणी केल्याशिवाय निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येऊ नये.

म्हणून सदरची लेखी तक्रार देत आहे. 88-लोहा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार म्हणून आज मतमोजणी दरम्यान शनिवार दिनांक 23/11/2024 रोजी दुपारी 3:00 वाजता मतमोजणीच्या 25 फेन्यांपैकी 15 फेऱ्यापूर्ण झालेल्या असतांना सदरची लेखी तक्रार मी स्वतः प्रत्यक्ष भेटून देत आहे. त्यामुळे माझ्या खालील मागण्याची पुर्तता केल्याशिवाय निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात येऊ नये. ही विनंती.

प्रमुख मागण्याः-

 

1) 88-लोहा विधानसभा मतदार संघातील झालेले एकूण 2.26,837 मतदारांच्या इव्हिएम मशील वरील मतदाना सोबतच व्हिव्हिपॅड मधील पुर्ण स्लिपची मतमोजणी करण्यात यावी. आणि त्या नंतरच निवडणूकीचा निकाल जाहिर करण्यात यावा.

2) 88-लोहा विधानसभा मतदार संघातील एकूण 338 मतदान केंद्रावरील सर्व इव्हिएम मशीन आणि व्हिव्हिपॅड मशील माझ्या किंवा माझ्या प्रतिनिधीच्या स्वाक्षरीसह शिल

3) करून मला कळविल्या शिवाय मशील लोहा येथून नांदेड येथील स्ट्राँग रुममध्ये हालवण्यात येऊ नयेत.

4) माझी मा. उच्च न्यायालयात दाखल होत असलेल्या निवडणूक याचीकेचा निकाल लागे पर्यंत इव्हिएम व व्हिव्हिपॅड मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रूमवर 24 घंटे माझा प्रतिनिधी

ठेवण्यास परवानगी देऊन दररोजचे 24 तासाचे सीसीटीव्ही फुटेज मला देण्यात यावे. 5) 88-लोहा विधानसभा मतदार संघातील पोष्टल व एकूण 2971 टपाली मतदान व इटीपीबीएमएस चे 217 असे एकूण 3188 मतांची पुन्हा मोजणी करण्यात यावी.

6) इव्हिएम मशीन मध्ये तांत्रिक दृष्टया मॅनेजमेंट करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार श्री प्रताप चिखलीकर यांनी फ्रॉड केलेला असल्यामुळे 88-लोहा विधानसभा मतदार संघातील एकूण 338 मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्यात यावे. तरी कृपया या लेखी तक्रारी द्वारे आपणास विनंती की, वरील 5 ही मुद्दयावर निर्णय

घेऊन 88-लोहा विधानसभा मतदार संघातील एकूण 338 मतदान केंद्रावरील व्हिव्हिपॅड मशीन मधील स्लिपची मतमोजणी केल्याशिवाय कोणताही निर्णय घोषित करण्यात येऊ नये. कारण मतदार संघातील हाजारो मतदार आणि कार्यकर्त्यांच्या या बाबत भावना अत्यंत तिव्र असून आपण निर्णय जाहिर केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास उमेदवार म्हणून माझ्यावर जबाबदारी राहणार नाही. आणि तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाद मागणार आहे याची दखल घेऊन निर्णय घ्यावा. ही नम्र विनंती,

तक्रार देणार

प्रा. मनोहर बाबाराव धोंडे

जनशक्ती पार्टी (अपक्ष) उमेदवार

सेवा 88-लोहा विधानसभा मतदार संघ, जिल्हा नांदेड

मोबाईल नं. 9422210567/9823888825 ई-मेल :[email protected]

2

3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *