*लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ प्रतापराव पाटील चिखलीकर यांचाच बालेकिल्ला.*
*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*
लोहा विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची बहीण आशाबाई शिंदे यांनी आव्हान दिले होते. त्याामुळे याठिकाणी विधानसभेला बहिण विरुद्ध भाऊ सामना रंगणार होता.मात्र मतदारसंघात बहिण विरुद्ध भाऊ, अशी लढत झालीच नाही.
बहिण भाऊ असलेल्या आशाबाई शिंदे आणि माजी खासदार चिखलीकर यांच्यात राज्यात हायहोल्टेज लढत म्हणून या मतदारसंघाकडे पाहिले जात होते. चिखलीकर यांचा गड असलेला मतदारसंघ काबीज करण्यात चिखलीकर यशस्वी ठरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.
लोहा कंधार विधानसभेमध्ये अटीतटीच्या लढतीत महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी लोहा कंधार शहराच्या चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी करीत गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
लोहा कंधार विधानसभेची निवडणूक महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर व महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांच्यात खूप अटीतटीची लढत पाहण्यास मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेचे उमेदवार एकनाथ पवार यांचा १० हजार ९७३ मतांनी दणदणीत पराभव केला. त्यामुळे लोहा विधानसभा मतदारसंघ प्रतापराव पाटील चिखलीकर यांचाच बालेकिल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी प्रतापराव पाटील चिखलीकर यांना तिसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली.
निवडणूक जसजशी जवळ येत गेली तसं तसे वातावरण बदलत गेले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने अमलात आणल्यामुळे महिला मतदार भाजपकडे वळला गेला तसेच ” एक है तो सेफ है “, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची वीज बिल माफ आदी विकासाच्या घोषणा, प्रचारात सफल ठरल्याची दिसून आले. या निवडणुकीत काही लोकांनी जातीपातीचा रंग देण्याचाही प्रयत्न केला परंतु सुज्ञ मतदारांनी अशा शुल्लक गोष्टींना मूठ माती देऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले व आपल्या अमूल्य मतांचा कौल दिला. यामध्ये लाडकी बहीण योजना ही मात्र सर्वात मोठी गेम चेंजर ठरली असेच म्हणावे लागेल.
लोहा कंधार विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित दादा पवार गटाचे उमेदवार माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ७२७५० मते घेवून प्रचंड मतानी विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेनेचे एकनाथ दादा पवार यांना ६१७७७ मते पडली आहेत माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार एकनाथ दादा पवार यांचा १०९७३ मतानी पराभव केला आहे. माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ७२७५० मते घेवून लोहा कंधार विधान सभेच्या निवडणूकीत प्रचंड मतानी विजयी झाले आहेत.
लोहा कंधार विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाने आहेत. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे प्रताप पाटील चिखलीकर ७२७५० मते घेवून विजयी झाले आहेत, महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे एकनाथ दादा पवार यांना ६१७७७ मते पडली आहेत, चंद्रसेन पाटील सुरनर यांना २९१९४ मते पडली आहेत, प्रा. मनोहर धोंडे यांना २०६४३ मते पडली आहेत, शिवकुमार नरंगले यांना २०३०२ मते पडली आहेत, आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांना १९७८६ मते पडली आहेत ,नोटाला १०८२ मते पडली असुन एकुण मतदान २२६९९१ मतांची मतमोजणी झाली आहे
आता लोहा कंधार मतदारसंघाला अटीतटीच्या सामन्यात भावी नव्हे तर फिक्स आमदार मिळाला आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पक्षात वजन असल्याने मंत्रीपद मिळेल काय हे काही दिवसात स्पष्ट होईल.
या विजयाच्या जल्लोशात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट , भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीत व गुलालाची उधळण करून शहरातील प्रत्येक चौकात , गावोगावी आनंदोत्सव साजरा केला.