गरमागरम कुळथाचं पिठलं आणि भात..

आमच्या पुण्यात बऱ्यापैकी गारठा आहे आणि मी कोकणातली त्यामुळे रोज भात हवाच.. पुण्यातल्या मंडळीसारखी मी डाएटवर आहे म्हणुन भात अजिबात बंद करत नाही आणि कोणाला सल्लाही देत नाही.. भात खाते आणि टेकडी चढते.. आज खुप दिवसाने कुळीथ पिठल्याची आठवण आली आणि त्यासोबत मिरचीचं लोणचं असेल तर मग स्वर्गही ठेंगणा वाटायला लागतो.. आणि कढईच्या कडेला लागलेलं खरपूस पिठलं चाटुन खाताना बोटंही खावीत असं वाटतं.. माझ्या पुणेरी मित्राला कुळथाचं पिठलं आवडत नाही पण मैद्याची रोटी आवडते त्यावरुन आमच्या दोघात चांगलीच जुंपते..

काल संध्याकाळी पिठलं भाताचा प्लॅन केला होता.. पिठलं करत असताना त्याच मित्राचा फोन आला .. सोनल डिनर ला येउ का आज ??.. काय करणार आहेस ??.. त्याला ये म्हटलंस आणि फोन ठेवुन दिला.. पुढच्या १५ मिनीटात तो गेटवर हजर.. मी जेवायला काय केलय याचा त्याला पत्ताच नव्हता.. काल मी ठरवलच होतं , त्याला पिठलं खायलाच लावायचं.. तो ट्रेक ला जाऊन आला होता त्यामुळे खूपच भुकेलेला होता.. २ गतमागरम भाकऱ्या केल्या आणि ताट त्याच्या हातात दिलं.. माझ्या यात्रेबद्द्ल विचारत विचारत तो पिठलं भात आणि भाकरी खाऊ लागला.. मी थोडीशी घाबरले होते कारण त्याला न आवडलेला पदार्थ मी त्याला दिला होता.. त्याने मिटक्या मारत सगळं ताटातलं संपवलं आणि हात धुवुन आल्यावर तांबूल देताना मी त्याला विचारलं तुला कुळथाचं पिठलं समजलं नाही का ??.. आज कसं काय खाल्लस ?? तो म्हणाला , अगं वासावरुनच मी ओळखलं पण असा एक किस्सा घडला त्या क्षणापासून मी ठरवलं की , जे समोर येइल ते खायचं.. माज करायचा नाही.. तो किस्सा सांगू लागला.. आणि खरच आज पिठलं मनापासून आवडलही..

एके ठिकाणी तो आणि त्याचे मित्र ट्रेकला गेले असताना पावसात अडकले होते आणि त्यावेळी रात्रभर त्यांना रस्ता सापडत नव्हता आणि खायलाही काही मिळाले नव्हते .. ती रात्र तो म्हणाला कधीही विसरणार नाही आणि त्या दिवसानंतर मी कारलं, शेपु सगळ्या भाज्या खाऊ लागलो .. अगदी शिळं सुध्दा खातो. असही तो सांगत होता… वेळ आणि काळ खूप काही शिकवत असतात.. त्यामुळे पैसा , प्रतिष्ठा , मान सन्मान , प्रॉपर्टी कशाचाही गर्व कामाचा नाही हेच खरं.. खुप दिवस पिठलं केलं नव्हतं म्हणुन बेत केला होता पण त्यातूनही असं काहीतरी शिकायला मिळेल असं वाटलं नव्हतं.. कालचं पिठलं काहीतरी विलक्षण चव देउन गेलं हे मात्र खरं.. इथून पुढे जेव्हा जेव्हा असा बेत करेन तेव्हा तेव्हा माझ्या मित्राची आणि या किस्याची आठवण येत राहिल..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *