मुखेड ; प्रतिनिधी
तालुक्यातील हिरानगर तांडा येथील सुपुत्र हवलदार सुधाकर शंकर राठोड 127 Lt Ad regt. वय वर्ष 39 लेह या ठिकाणी सिंयाचन ग्लेशरमध्ये मायनस -22 डिग्री सेल्सिअस मध्ये बर्फाळ भागात भूतलावरून पंचवीस हजार फूट उंचीवर जिथे खूप कमी ऑक्सिजन असतो अशा पोस्टावर आपली ड्युटी बजावत असताना अति थंड व बर्फाच्या रिएक्शन मुळे बेशुद्ध झाले होते. उपचारासाठी त्यांना चंदीगड कमांड हॉस्पिटलमध्ये आणले होते उपचार घेत असतानाच दिनांक २५ नोव्हेंबर 2024 वार सोमवार सकाळी 5 च्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई धोंड्याबाई राठोड वडील शंकर राठोड, पत्नी आशाबाई सुधाकर राठोड, 2009 ला लग्न झाले होते. मुलगा ओम वय वर्ष 8 मुलगी साक्षी वय वर्ष 6 तसेच भाऊ मधुकर राठोड बहीण कमलबाई चव्हाण यांचे लग्न झाले. वडील शंकर राठोड यांचे दोन वर्षाखाली निधन झाले असुन. शहीद सुधाकर राठोड हे 2006 ला भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. भारतीय सैन्य दलात त्यांची 19 वर्ष सेवा झाली. पुढच्याच वर्षी त्यांना स्वंय इच्छुक सेवानिवृत्ति घ्यायची होती.
सेवानिवृत्तीच्या काही महिन्यापूर्वीच त्यावर काळाने घात घातला. पार्थिव चंदीगड वरून हैदराबादला विमानाने उद्या येणार आहे. आणि हैदराबाद वरून बाय रोड देगलूर मार्गे मुक्रामाबाद पोलीस स्टेशन येथे येणार आहे. अंत्यविधी दिनांक 27 -11- 2024 रोज बुधवार सकाळी 10 : 00 वाजता. शासकीय ईतमामात हिरानगर तांडा ता. मुखेड येथे होणार आहे. हीरानगर तांडा हे मुखेड पासून 25 किलोमीटर अंतरावर बाराळी च्या समोर पाच किलोमीटर वर आहे. तरी मुखेड तालुका तसेच जिल्ह्यातील सामाजिक राजकीय तथा शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी शहिदांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहावे ही विनंती..तसेच आजी व माजी सैनिकांनी मेडल व युनिफॉर्मवर यायचं ज्ञानेश्वर पाटील डुमणे*
*जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन नांदेड यांनी केले .*अंत्यविधी दिनांक 27 -11- 2024 वार बुधवार सकाळी दहा वाजता ठिकाण हिरानगर तांडा ता. मुखेड जि. नांदेड*