कंधार दिनांक 26 नोव्हेंबर (प्रतिनिधी )
संविधानामुळे सर्वांना समानतेचा हक्क मिळाला भारतीय स्त्रियांना समाजात पुरुषाच्या बरोबरीने स्थान मिळाल्यामुळे त्या सर्वच क्षेत्रात प्रगती करत आहेत असे प्रतिपादन प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींचे विद्यालय कंधार येथील आयोजित अभिवादन सभेमध्ये बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाधक्षा सौ. वर्षाताई भोसीकर यांनी केले यावेळी संजय शिक्षण संस्था कंधारचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ भोसीकर, प्राचार्य किरण बडवणे,प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी 26/11च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सौ. वर्षाताई म्हणाल्या की भारतीय राज्यघटना अमलात आल्यापासून भारतातील प्रत्येक नागरिकांना सर्व समान हक्क मिळाले महिलांना पुरुषाच्या बरोबरीने हक्क मिळाल्यामुळे महिला प्रगती करू शकल्या समाजात तिचे मानाचे स्थान वाढले आज महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असून राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचल्या आहेत हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय घटनेमुळे घडले आहे या संविधानाचा प्रत्येक भारतीय नागरिकांनी आदर व पालन करावे असे प्रतिपादन सौ. वर्षाताई यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य किरण बडवणे यांनी केले, तर सूत्र सचलणं सौ. श्यामा पाटील यांनी केले.